पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांबरोबरच तरसांचा वावर वाढला आहे .शेतकरी, नागरिकांना तरसांचे दर्शन सर्रास होत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे . सोमवारी (दि. ३०) सकाळी ७ वाजता वळती गावानजिक तागडेवस्तीत रस्त्यावर तरस मुक्तपणे फिरताना अनेक जणांनी पाहीला. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या देखील अधिक आहे.
नागापूर, थोरांदळे, रांजणी, वळती, पारगाव परिसरात बिबट्यांची दहशत कायम आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ला सत्र सुरुच आहे. आता बिबट्यांबरोबरच तरसांचा देखील वावर वाढला आहे. वळती गावाला सर्वाधिक वनक्षेत्र लाभले आहे. भागडेश्वर डोंगर परिसर, तागडेवस्तीत वनक्षेत्र अधिक आहे. तसेच मीना, घोड नद्यांच्या पात्रात मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे बिबट्यांसह तरस, वानर, मोर, कोल्हे आणि लांडग्यांचे वास्तव्य या परिसरात आहे.
हेही वाचा :