पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बाबत वादग्रस्त विधान केले होते. या वादामध्ये उडी घेत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने शोएब अख्तरला सडेतोड उत्तर दिलं आहे. (Sourav Ganguly)
बॅकस्टेज विथ बोरिया या कार्यक्रमात शोएब अख्तर म्हणाला, 'मला असं वाटतं की विराट कोहलीने आगामी वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेट खेळू नये. विराट कोहलीला टी-20 खेळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे. मला वाटते की त्याने अजून किमान सहा वर्षे तरी क्रिकेट खेळून सचिन तेंडुलकरचे १०० शतकांचा विक्रम मोडावा. विराटकडे सचिनचे विक्रम मोडण्याची क्षमता आहे. त्याने वर्ल्डकपनंतर टी-२० आणि वन-डेमधून निवृत्ती घेवून कसोटी क्रिकेटवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे' (Sourav Ganguly)
दरम्यान, शोएबच्या या वक्तव्याचा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने चांगलाच समाचार घेतला. यावेळी तो म्हणाला, विराट त्याला हवा तो क्रिकेट फॉरमॅटम खेळू शकतो. कारण तो त्यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय.
यासह सौरव गांगुलीने टीम इंडियाला एक सल्ला दिला. सौरव गांगुली म्हणाला की, 'संघाने सर्वोत्तम क्रिकेटपटू निवडावेत, मग तो डावखुरा असो वा उजव्या हाताने खेळणारा असो. भारताकडे काही दर्जेदार डावखुरे फलंदाज आहेत. ते संघात नक्कीच स्थान मिळवतील.
यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा आणि इशान किशन हे डावखुरे फलंदाज आहेत. यांच्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या हे उजव्या हाताने खेळणारे खेळाडू आहेत. हा एक जबरदस्त संघ आहे. भारत असा देश आहे की इथे प्रत्येक सामन्यानंतर संघाचे मुल्यमापन होते. ज्यावेळी ते जिंकतात त्यावेळी तो चांगला संघ असतो. मात्र एखाद्या सामन्यात पराभव झाला तर, त्यावेळी तोच संघ वाईट होतो. तुम्हाला आता याची सवय झाली पाहिजे. हा खेळाचाच एक भाग आहे.
हेही वाचा;