Latest

जळगावात ठाकरे गटाकडून करण पवार रिंगणात, स्मिता वाघ यांच्यासमोर तगडे आव्हान

गणेश सोनवणे

जळगाव : जळगाव लोकसभेच्या रिंगणात ठाकरे गटाकडून करण पवार रिंगणात उतरले आहेत. आज ठाकरे गटाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, करण पवार ठाकरे गटाकडून व स्मिता वाघ भाजपकडून अशी लढत आता जळगाव लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जळगाव लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यांना उन्मेष पाटील यांची साथ मिळणार असल्याने स्मिता वाघ यांच्यापुढे आता पवार यांचे तगडे आव्हान आहेत.

कोण आहेत करण पवार, काय आहे वारसा?

राजकारणाचे बाळकडू करण पवार यांना आजोबा- वडील -आई यांच्याकडून जन्मताच मिळालेले आहे. त्यांचे आजोबा कैलासवासी आप्पासाहेब भास्करराव राजाराम पाटील हे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. वडील बाळासाहेब भास्करराव पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य, नियोजन मंडळ सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळाचे सभापती राहिलेले आहेत. आई सुजाता बाळासाहेब पाटील या पंचायत समिती सदस्य होत्या. त्याचा हाच वारसा त्यांच्या पत्नी अंजली यांनी पुढे चालू ठेवला आहे. त्याही नगरसेविका असून पारोळा नगरपालिकेत महिला बालकल्याण सभापती आहेत. तसेच एरंडोल पारोळा मतदार संघाचे माजी आमदार व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील हे करण पाटील यांचे काका आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार करण पाटील यांचा राजकीय वारसा हा मोठा आहे. जळगाव लोकसभेमध्ये पारोळा एरंडोल अमळनेर चाळीसगाव या मतदारसंघांमध्ये करण पवार यांचा चांगल्या जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपा समोर मोठे आव्हान करण पवारांमुळे उभे राहिले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT