Latest

बोरांच्या सेवनानेे वाढते रोगप्रतिकारक शक्ती

दिनेश चोरगे

नवी दिल्ली : श्रीरामाला गोड बोरं खाऊ घालावीत या हेतूने भाबड्या शबरीने ती आधी स्वतः चाखून भगवंताला दिली आणि रामरायाने ही उष्टी बोरं आनंदाने खाल्ली! बोर फळाशी निगडित असलेल्या या कथेमुळे आपलाही एक भावुक संबंध या फळाशी जोडला गेलेला आहे. हिवाळ्यात बोरं बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अनेकांना बोरं आवडतातही. या फळाचे आरोग्याच्या द़ृष्टीनेही बरेच लाभ असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः बोर फळामुळे आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. बोरांमध्ये भरपूर पाणी आणि आर्द्रता आढळते. बोर फळ खाल्ल्याने नैसर्गिकरित्या चांगली झोप लागते. पोषक द्रव्यांसह बोरं अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध आहेत. बोरांमध्ये सोडियम आणि लोह देखील मोठ्या प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि शरीरातील पेशींना निरोगी बनवण्यास मदत करतात. बोर फळामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे आहे. बोर फळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याचे दाहकविरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. बोरांमध्ये संसर्ग रोखण्याचे गुणधर्मही आहेत. बोरांमध्ये 'व्हिटॅमिन सी' मोठ्या प्रमाणात असते. या बोरांचे सेवन केल्याने शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. बोर हे 'ऊर्जा बूस्टर' फळ आहे. थकवा लवकर दूर करण्यासाठी बोर फळ खावे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बोर फळ फायदेशीर ठरते. बोर शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. बोरांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. बोर खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात. सांधेदुखीवरही बोर फळ चांगला उपाय आहे.

SCROLL FOR NEXT