Latest

IMD Weather forecast : उत्तर भारतात धुक्याची चादर आणखी गडद होणार!

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: IMD Weather forecast गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक राज्यात दाट धुके आहे. दरम्यान पुढील ३ ते ४ दिवस उत्तर भारतात धुक्याची चादर आणखी गडद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वायव्य आणि त्याच्या भोवतीच्या मध्य भारतात पुढील ३ ते ४ दिवस घनदाट ते अतिघनदाट धुके कायम राहण्याची शक्यता देखील विभागाकडून वर्तवली आहे. (Dense to very dense fog)

हवामान विभागाच्‍या बुलेटीननुसार, पुढील ३ ते ४ दिवस पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात घनदाट धुक्याची चादर राहणार आहे. दरम्यान, हवामानाची दृश्यता 0-50 मीटर इतकी असणार आहे. पंजाबच्या अनेक भागात, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये देखील दाट धुक्यांची शक्यता आहे. हवामानाची दृश्यता 50-200 मीटर अशी वर्तवण्यात आली आहे. (IMD Weather forecast)

शनिवारी 30 डिसेंबरपासून वायव्य भारतावर नवीन निर्माण झालेल्या 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'चा परिणाम होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावाखाली येणाऱ्या लगतच्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य भारतात देखील शनिवारी ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. (IMD Weather forecast)

IMD Weather forecast : उत्तर भारतातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम

उत्तर भारतात पुढील ३ ते ४ दिवसात दाट ते अतिघनदाट धुक्यांची शक्यता आहे. त्यामुळे  काही विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे मार्गांवर देखील परिणाम होऊ शकताे. यामुळे कमी रहदारी असताना देखील प्रवासाच्या वेळेसह ड्रायव्हिंगची कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. सावधगिरीचे उपायांकडे दुर्लक्ष केल्‍यास अपघात होऊ शकतात, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT