Latest

IMD update : राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट जारी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवामान विभागाने (IMD-India Meteorological Department)  रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासांठी यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर बातमी. (IMD update)

IMD update
IMD update

गेले महिनाभर आभाळाकडे डोळे लाऊन बसलेला बळीराजा शनिवारी (दि. २४) सुखावला आहे. पाण्या अभावी ऊस व भात पीक करपून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शनिवारी (दि. २४) सकाळपासून राज्यभरात पावसाने (IMD update) जोरदार एन्ट्री केली. तर भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अपडेटनूसार, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना २५ जून, २६ जून, २७ जून आणि २८ जून रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्याला आज (दि.२५) पासून येत्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज (दि.२५) आणि उद्या (दि.२६) ऑरेंज अलर्ट आणि दि.२७ जून आणि दि.२८ जून रोजी येलो अलर्ट जाहीर केला आहे.  

मुंबई शहरात १०४ मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात गेल्या २४ तासात अनुक्रमे १२३ मिमी आणि १३९ मिमी पाऊस झाला आहे.  आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT