Latest

IFFI 2024 : रेड कार्पेटवर अवरतले मनोज वाजपेयी

Shambhuraj Pachindre

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मास्टर क्लास पॅनेलसाठी शुक्रवारी 24 रोजी अभिनेता मनोज वाजपेयी हे रेड कार्पेटवर अवतरले. (IFFI 2024)

सत्या चित्रपटाच्या भिकू म्हात्रेची भूमिका त्यांना सिनेसृष्टीत ओळख देवून गेली. त्यानंतर त्यांचे शूल, गँग्स ऑफ वासेपूर, अलीगढ, स्पेशल 26 आदी चित्रपट गाजले. इफ्फीच्या आयोजकांनी शुक्रवारी (दि.24) दुपारी मनोज वाजपेयी रेड कार्पेटवर येणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. मनोज वाजपेयी यांचे रेड कार्पेटवर आगमन होताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी अभिनेता राज निडुमोरू, श्रीकृष्ण दयाल व अपूर्व बक्षी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT