Latest

Goa Liquor : गोव्यातून दारुची तस्‍करी करणार्‍यांवर हाेणार माेक्‍कातंर्गत कारवाई : मंत्री शंभुराज देसाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोवा बनावट दारु तस्‍करी राेखण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यातून विनापरवाना (Goa Liquor) दारू आणल्यास मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

शंभूराज देसाई म्‍हणाले की, "गोव्यातून दारुची तस्‍करी करताना तीनवेळा एकाच व्यक्तीकडून गुन्हा घडला तर त्‍याच्‍यावर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्‍यानुसार ( मोक्का ) कारवाई केली जाईल. यासंदर्भात संबंधित विभागाच्या आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे; पण आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही."  (Goa Liquor)

गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारणार असल्याची माहिती देखील देसाई यांनी दिली. गोवा राज्याची सीमा जवळ असल्याने गडहिंग्लज उपविभागात दारूच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. ही तस्करी रोखण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर नेहमीच आव्हान असते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT