Latest

Afghanistan Win : अफगाणिस्ताकडून पाकिस्तानचे ‘वस्त्रहरण’! वर्ल्डकपमधील तिसरा उलटफेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Afghanistan Win Against Pakistan : अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' करून वनडे विश्वचषकातील दुस-या सनसनाटी विजयाची नोंद केली. यंदाच्या विश्वचषकातला हा तिसरा उलटफेर ठरला आहे. बंगळूरच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे अफगाण संघाने आपल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर पार केले आणि 8 विकेट्स राखून सामना खिशात घातला. इब्राहिम झद्रान (87 धावा), रहमानउल्ला गुरबाज (65), रहमत शाह (नाबाद 77), हशमतुल्ला शाहिदी (नाबाद 48) हे अफगाणिस्तानच्या या रोमहर्षक विजयाचे हिरो ठरले. या विजयासह अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी दोघांमध्ये 7 सामने खेळले गेले होते आणि सर्व सामन्यांत पाकने बाजी मारली होती.

अफगाणी सलामीवीरांची धमाकेदार सुरुवात

283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला सलामीवीर झद्रान आणि गुरबाज यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पाक गोलंदाजांवर एकापाठोपाठ आक्रमण चढवले. या दोघांनी पॉवरप्लेच्या 10 षटकांत 60 धावा केल्या. शाहीनच्या पहिल्याच षटकात 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या- चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या षटकात एकूण 16 जमा केल्या. सहाव्या षटकात पंचांनी झद्रानला बाद घोषित केले. अशा परिस्थितीत डीआरएसने त्याला वाचवले. जीवदान मिळाल्यानंतर आठव्या षटकात झद्रानने गुरबाजसह हरिस रौफच्या एका षटकात 17 धावा चोपल्या. या दोघांनी हरिसच्या एका षटकात चार चौकार मारले.

अफगाणी सलामीवीरांची धमाकेदार सुरुवात

283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला सलामीवीर झद्रान आणि गुरबाज यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पाक गोलंदाजांवर एकापाठोपाठ आक्रमण चढवले. या दोघांनी पॉवरप्लेच्या 10 षटकांत 60 धावा केल्या. शाहीनच्या पहिल्याच षटकात 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या- चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या षटकात एकूण 16 जमा केल्या. सहाव्या षटकात पंचांनी झद्रानला बाद घोषित केले. अशा परिस्थितीत डीआरएसने त्याला वाचवले. जीवदान मिळाल्यानंतर आठव्या षटकात झद्रानने गुरबाजसह हरिस रौफच्या एका षटकात 17 धावा चोपल्या. या दोघांनी हरिसच्या एका षटकात चार चौकार मारले. हीच फटकेबाजीची लय दोघांनी काय ठेवली आणि पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागिदारी रचली.

अफगाणिस्तानची पहिली विकेट 130 धावांवर पडली. शाहीन आफ्रिदीने रहमानउल्ला गुरबाजला बाद केले. गुरबाजने 53 चेंडूत 65 धावा केल्या. ओसामा मीरने त्याचा झेल घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रहमत शाहने आणि इब्राहिम झद्रानला खंबीर साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. झद्रान त्याच्या शतकाच्या जवळ पोहचला होता पण 13 धावांनी त्याला हुलकावणी मिळाली. तो 87 धावांवर बाद झाला. 190 धावांवर अफगाणिस्तानची दुसरी विकेट पडली. हसन अलीने झद्रानला मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले.

कर्णधार हशमतुल्लाह शहीदी मैदानात उतरला. त्याने शाह सोबत संयमी खेळी केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या धावसंख्येने दोन गडी गमावून 200 धावा पार केल्या. दोघांनी चांगली भागीदारी करून संघाला हळूहळू लक्ष्याच्या जवळ नेले आणि आणि अखेर 49 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शहीदीने चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला.

झद्रानच्या सर्वात जलद 1000 धावा

आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या झद्रानने या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. तो अफगाणिस्तानसाठी सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. डावातील तिसरी धाव घेत त्याने हा टप्पा गाठला. झद्रानला ही कामगिरी करण्यासाठी केवळ 24 डाव लागले. या बाबतीत त्याने आपला सहकारी गुरबाजला (27 डाव) मागे सोडले.

पाकिस्तानने जिंकला टॉस

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकने सावध सुरुवात केली आणि आठ षटकांमध्‍ये 51 धावा केल्‍या. मात्र पाकिस्तानला पहिला धक्का 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बसला. अजमतुल्लाने इमाम उल हकला नवीन उल हककरवी झेलबाद केले. इमाम 22 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याने अब्दुल्ला शफीकसोबत 56 धावांची भागीदारी केली.

अब्दुल्ला शफीकचे अर्धशतक

पाकिस्तानला 110 धावांवर दुसरा धक्का बसला. 23 व्या षटकात नूर अहमदने अब्दुल्ला शफीकला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर 25व्या षटकात नूर अहमदने मोहम्मद रिझवानला मुजीबकरवी झेलबाद केले. रिझवानला आठ धावा करता आल्या. शफीकने 75 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.

बाबरची 74 धावांची महत्त्‍वपूर्ण खेळी

34 व्‍या षटकामध्‍ये 163 धावांवर पाकिस्‍तानला चौथा धक्‍का बसला. नबीच्‍या गोलंदाजीवर शकीलने रशीद खानकडे झेल दिला. त्‍याने 34 चेंडूमध्‍ये 25 धावा केल्‍या धावांमध्‍ये केल्‍या. 36 व्‍या षटकात कर्णधार बाबर आझमने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्‍याने 69 चेंडूत 4 चौकाराच्‍या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर बाबर आझमने पाकिस्‍तानचा डाव सावरला. पाकिस्‍ताने 200 धावांचा टप्‍पा पूर्ण केला. मात्र 42 व्‍या षटकात नूर अमदने नबी करवी बाबरला बाद केले. त्‍याने 92 चेंडूत 74 धावांची खेळी केली. यामध्‍ये 4 चौकार तर 1 षटकाराचा समावेश होता.

इफ्तिखार आणि शादाबची अर्धशतकी भागीदारी

बाबर बाद झाल्‍यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी फटकेबाजी करत धावफलक हालता ठेवला. या दाेघांची अर्धशतकी भागीदारी पाकिस्‍तानसाठी महत्त्‍वपूर्ण ठरली. अखेरच्‍या षटकात नवीन हकच्‍या गाेलंदाजीवर इफ्तिखारने अजमतुल्‍लाकडे साेपा झेल दिला. त्‍याने 4 षटकार आणि 2 चाैकारच्‍या मदतीने 27 चेंडूत 40 धावा केल्‍या. अखेरच्‍या षटकातील शेवटच्‍या चेंडूवर शादाब खान याने नबीकडे झेल दिला. त्‍याने 1 षटकार आणि 1 चाैकाराच्‍या मदतीने 38 चेंडूत 40 धाा केल्‍या. नवीन-उल-हकने अखेरच्‍या षटकात दाेन बळी घेतले. अखेर 50 षटकात पाकिस्‍ताने 7 गडी गमावत 282 धावा केल्‍या. अफगाणिस्‍तानच्‍या नवीन-उल-हक याने 2, मोहम्मद नबी 1, अजमातुल्लाह ओमरजाई 1, नूर अहमद 3 बळी घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT