Latest

Matt Henry : न्यूझीलंडला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मॅट हेन्री वर्ल्डकपमधून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Matt Henry : विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या अडचणीत वाढत होत आहे. खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या या संघाला मॅट हेन्रीच्या रूपाने आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुखापत झालेला हेन्री हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

हेन्रीचा (Matt Henry) एमआरआय रिपोर्ट समोर आला आहे. त्याला ग्रेड-2 ची दुखापत झाल्याचे समजते आले आहे. ज्यामुळे हेन्रीला बरे होण्यासाठी 2 ते 4 आठवडे लागू शकतात. अशा परिस्थितीत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हेन्रीच्या जागी काईल जेमिसनला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघात हेन्री व्यतिरिक्त केन विल्यमसन, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमन आणि जिमी नीशम हे देखील जखमी आहेत. याचा अर्थ किवी संघाकडे फक्त 11 फिट खेळाडू उपलब्ध असल्याची चर्चा रंगली आहे.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, संपूर्ण संघ हेन्रीबद्दल विचार करत आहे आणि 2023 च्या विश्वचषकातून तो बाहेर पडल्याने संपूर्ण संघ निराश झाला आहे. मॅट हा आमच्या एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आयसीसीच्या टॉप-10 गोलंदाजांमध्ये आहे. विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असताना हेन्री संघासोबत नसणे ही निराशाजनक बाब आहे.'

जेमिसन गुरुवारी रात्री उशिरा बंगळूरला पोहोचला असून त्याने शुक्रवारी संघासोबत सराव केला. गरज भासल्यास तो शनिवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास तयार असेल. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फर्ग्युसन उपलब्ध होईल, अशी आशा आहे. चॅपमनचीही प्रकृती ठिक होत आहे. नीशमचा एक्स-रे रिपोर्ट आला असून त्यात हाडाला दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे. विल्यमसनने फलंदाजीचा सरावही सुरू केला आहे, अशी माहितीही प्रशिक्षक स्टेड यांनी दिली.

हेन्रीने (Matt Henry) विश्वचषकातील सात सामन्यांमध्ये 28.63 च्या सरासरीने आणि 5.79 च्या इकॉनॉमी रेटने 11 बळी घेतले आहेत. इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सलग दोन सामन्यांत त्याने प्रत्येकी तीन बळी घेतले होते.

SCROLL FOR NEXT