Latest

ICC Team : टी-20 संघात भारत चमकला, सूर्यासह 3 खेळाडूंचा समावेश

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Team : आयसीसीने (ICC) 2022 च्या पुरस्कारांची घोषणा सुरू केली आहे. सोमवारी, वर्षातील पहिला आयसीसी टी 20 (ICC T20) आंतरराष्ट्रीय संघ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये भारतीय संघाचा (Team India) दबदबा दिसून आला. या आयसीसी संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश झाला असून यामध्ये 2022 कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवचेही (Suryakumar Yadav) नाव चमकले आहे.

आयसीसीच्या टी-20 संघात भारताच्या दोन फलंदाज आणि एका अष्टपैलूला स्थान मिळाले आहे. यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) व्यतिरिक्त, विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांचा समावेश आहे. या संघाचे नेतृत्व इंग्लंडला टी-20 विश्वचषक जिंकूण देणा-या जोस बटलरकडे सोपवण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान-इंग्लंडचे 2-2, न्यूझीलंड-झिम्बाब्वे-श्रीलंका-आयर्लंडचे प्रत्येकी एक-एक खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीने 2022 चा टी-20 संघ जाहीर केला आहे. यात भारताच्या दोन फलंदाज आणि एका अष्टपैलूला स्थान मिळाले आहे. यात सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. या संघाचे नेतृत्व इंग्लंडला टी-20 विश्वचषक जिंकूण देणा-या जोस बटलरकडे सोपवण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान-इंग्लंडचे 2-2, न्यूझीलंड-झिम्बाब्वे-श्रीलंका-आयर्लंडचे प्रत्येकी एक-एक खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीने निवडलेल्या संघात इंग्लंडच्या जोस बटलरची यष्टिरक्षक/ओपनर म्हणून निवड करण्यात आली आहे, तर पाकच्या मोहम्मद रिझवानचा सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, तर सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

याशिवाय ग्लेन फिलिप्सने 5 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला सहाव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. या संघात हार्दिक पांड्या आणि रझा यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. सॅम कुरेन, वानिंदू हसरंगा हारिस रौफ आणि जोस लिटल हे देखील आयसीसी टी-20 संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा या संघात समावेश केलेला नाही. दुसरीकडे, पाकच्या हरिस रौफ आणि मोहम्मद रिझवान यांना आयसीसीने त्यांच्या टी-20 सर्वोत्तम संघात स्थान दिले आहे. खरंतर, 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बाबरचा फॉर्म खूपच खराब होता. त्यामुळेच पाकिस्तानी कर्णधाराला या संघात स्थान मिळवता आलेले नाही.

आयसीसी पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय संघ 2022 पुढील प्रमाणे आहे…

1. जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर) (इंग्लंड)
2. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
3. विराट कोहली (भारत)
4. सूर्यकुमार यादव (भारत)
5. ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड)
6. सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
7. हार्दिक पंड्या (भारत)
8. सॅम कुरेन (इंग्लंड)
9. वानिंदू हसरंगा (श्रीलंका)
10. हरिस रौफ (पाकिस्तान)
11. जोश लिटल (आयर्लंड)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT