Latest

IBPS PO 2022 : बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या ६,४३२ पदांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनीच्या (Management Trainee) ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी २ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असून अर्ज आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार ibps.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंड बँक, यूको बँक आणि यूनियन बँक आदी बँकांमध्ये ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६,४३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रिलिमनरी परीक्षा (preliminary exam) ऑक्टोबरमध्ये होणार आहे. तर निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होईल. IBPS कडून लवकरच अंतिम तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

IBPS PO 2022 : पात्रता काय?

शिक्षण : उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून किमान पदवी शिक्षण घेतलेले असावे.
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२२ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे असावे आणि उच्च वयोमर्यादा ३० वर्षे आहे. सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल केली जाईल.

जाणून घ्या किती मिळेल पगार?

आयबीपीएस पीओ (IBPS PO) वेतन रचनेत बदल होत असतो. सध्या एका बँकेत पीओ पदासाठी ५२ हजार ते ५७ हजार (पोस्टिंग ठिकाणानुसार) पगार मिळतो. बेसिक पे २३,७०० रुपयांपासून सुरु होते आणि ४ इंक्रीमेंट मिळतात.

IBPS PO recruitment 2022 : अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या

ऑनलाइन अर्ज लिंकवर (online application link) क्लिक करा

तपशील भरून नोंदणी करा

अर्ज भरा, फोटो अपलोड करा

फी भरा आणि सबमिटवर क्लिक करा

फी आणि चाचणी

उमेदवारांना अर्जासह intimation fee म्हणून ८५० रुपये भरावे लागतील. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील लोकांना १७५ रुपये भरावे लागतील. प्रिलिम्स एका तासाची संगणक-आधारित चाचणी असेल. प्रत्येकी १ गुण असलेले एकूण १०० प्रश्न विचारले जातील. IBPS द्वारे ठरविले जाणारे किमान कट-ऑफ गुण मिळवून उमेदवारांना तीनपैकी प्रत्येक चाचणीमध्ये पात्र व्हावे लागेल. आवश्यकतेनुसार IBPS ने ठरविल्यानुसार प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांची पुरेशी संख्या ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केली जाईल. चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला निश्चित केलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश किंवा ०.२५ गुण वजा केले जातील. प्रिलिम्स क्लिअर केल्यावर उमेदवारांना मुख्य आणि त्यानंतर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT