Latest

स्ट्रॉम्बोली बेटावरील ज्वालामुखीचा उद्रेक कॅमेऱ्यात कैद (पाहा व्हिडीओ )

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : इटलीमधील स्ट्रॉम्बोली बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये इटलीच्या स्ट्रॉम्बोली बेटावर झालेल्या ज्वालामुखीतून तीव्र ज्वाला उसळताना दिसत आहे. या ठिकाणाहून लाव्हारस बाहेर पडून तो समुद्राच्या काटावरून वाहत जात समुद्रात मिसळत आहे.

स्ट्रॉम्बोली या इटालियन बेटावर, जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखी केंद्राच्या बाजूने लाव्हाचे चमकणारे प्रवाह समुद्रात जाताना दिसलेत. हा उद्रेक इतका तीव्र होता की, लाव्हाबरोबर दाट, राखाडी धुराचे ढगही या परिसरात पसरलेले दिसले. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर इटलीच्या स्ट्रॉम्बोली बेटावरील रहिवाशांना बाहेर न पडण्‍याचे आवाहन येथील प्रशासनाने केले आहे.

स्ट्रॉम्बोली हे टायरेनियन समुद्रातील एओलियन द्वीपसमूहातील एक बेट आहे.उद्रेकासोबतच सामग्री, राख आणि लावा बाहेर काढणारा सतत सक्रिय असलेला ज्वालामुखी म्हणून हा ओळखला जातो. म्हणूनच स्ट्रॉम्बोली बेटावरी ज्वालामुखी  हा जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT