Latest

Eknath Khadse : राष्ट्रवादीचा मी राजीनामा दिला आहे : एकनाथ खडसे

Shambhuraj Pachindre

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे मी आता कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यास मोकळे असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Eknath Khadse)

एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी आज (दि.25) एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेऊन नामनिर्देशन पत्र भरले आहे. मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मात्र, मी अद्यापही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. (Eknath Khadse)

दोन्ही उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. अधिकाधिक मताने नेते निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यास मोकळा आहे. असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT