Latest

I & B Ministry & media: सट्टेबाजीच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातींना परवानगी न देण्याचे केंद्राचे निर्देश

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सट्टेबाजी, जुगारा संदर्भातील जाहिराती, प्रचारात्मक सामग्री कुठल्याही स्वरुपात न दाखवण्याचे आणि तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. माध्यम संस्था, ऑनलाईन जाहिरात मध्यस्थ आणि समाजमाध्यम मंचांसह सर्व संबंधितांना हे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास विविध कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा (I & B Ministry advises to media) देण्यात आला आहे.

एजंटांच्या जाळ्याविरोधात केंद्राने अलीकडे केलेल्या कारवाईतून संबंधित आरोपींनी जुगार अँप्सच्या वापरकर्त्यांकडून लक्षणीय पैसे गोळा करीत जुगार,सट्टेबाजीच्या मंचाच्या जाहिराती ग्राहकांसाठी, विशेषत: तरुण आणि मुलांसाठी मोठ्या प्रमाणत आर्थिक आणि सामाजिक-आर्धिक धोका निर्माण करतात, अशी बाब समोर आली. यासाठी हा निधी भारताबाहेर पाठवला होता.या यंत्रणेचा मनी लॉन्ड्रिग जाळ्याशी संबंध आहे,त्यामुळे देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असे मंत्रालयाकडून स्पष्ट (I & B Ministry advises to media) करण्यात आले आहे.

अशा जाहिरातींसाठी काळा पैसा वापरला जाण्याची दाट शक्यता आहे.असे असताना जाहिरात मध्यस्थ आणि समाज माध्यम मंचासह काही माध्यम संस्था, क्रिेकेट स्पर्धासह प्रमुख क्रिडा स्पर्धांमध्ये सट्टेबाजी आणि जुगार मंचाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातींना परवानगी देत आहेत, या अनुषंगाने मंत्रालयाने हे निर्देश (I & B Ministry advises to media) दिले आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT