Latest

नाशिकमधून शेकडो शिवसैनिक मुंबईकडे रवाना ; राऊतांच्या पाठबळासाठी शक्तीप्रदर्शन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी ऑनलाइन : भाजपची पोलखोल करण्यासाठी खासदार संजय राऊत आज (दि.15) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख या नात्याने त्यांना पाठबळ देण्यासाठी नाशिकमधून शिवसेनेच्या शेकडो गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. शिवसैनिक या पत्रकारपरिषदेवेळी शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

आज येथील घोटी टोलनाक्यावरुन शेकोडोंच्या संख्येने शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री तसेच अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. त्यात आता खा. राऊत यांचेही नाव घेतले जात असल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढला आहे. भाजपची पोलखोल करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यासाठी नाशिकमधून शिवसैनिक राऊतांच्या पाठबळासाठी जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT