Latest

human brain chip : मानवी मेंदूत चीप बसवण्याच्या प्रयोगाला अमेरिकेत मंजुरी

Arun Patil

वॉशिंग्टन : टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स किंवा ट्विटरचे सर्वेसर्वा अ‍ॅलन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात, तिथे काही ना काही तरी हटके करतातच. मस्क यांचा मानवी मेंदूत चीप human brain chip बसवण्याचा प्रयोग लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. त्यांची स्टार्टअप असलेल्या 'न्यूरालिंक'च्या या प्रयोगाला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अवघ्या काही दिवसांत याची ह्युमन ट्रायल होणार आहे. अ‍ॅलन मस्क यांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.

इलेक्ट्रिक कार असो वा हायपरलूप तंत्रज्ञान, मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असो वा ट्विटर, मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर 'हटके' करतात. आता मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट तयार केलंय जे संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरू शकतं. मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट सुरू केले आहे, ज्याद्वारे मानवी मेंदूत चीप बसवली जाणार आहे. human brain chip या चीपद्वारे मनुष्याला नवी ताकद मिळणार आहे. मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीनं 2016 पासूनच मानवी मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्याच्या प्रोजेक्टचं काम सुरू केलं होतं.

या प्रोजेक्टअंतर्गत मानवी परीक्षण करण्यासाठी अमेरिकन फूड अँड ड्रग्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून मंजुरी मिळाली आहे. 'न्यूरालिंक'च्या क्लिनिकल ट्रायल अंतर्गत, मेंदू संगणक इंटरफेस शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूच्या जवळ चीप human brain chip प्रत्यारोपित केली जाणार आहे. यानंतर चीपच्या हालचालीचे निरीक्षण केले जाणार आहे. संगणकाच्या मदतीने मानवी डोक्यात बसवलेली ही चीप कंट्रोल केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या लोकांनी न्यूरालिंकमध्ये काम करावं, असं आवाहन अ‍ॅलन मस्क यांनी केले होते.

सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आता 'न्यूरालिंक' प्रत्यक्षात मानवावर याची चाचणी करणार आहे. अनेक लोक या ह्युमन ट्रायलसाठी तयार झाले आहेत. human brain chip लवकरच हा प्रयोग प्रत्यक्षात सुरू केला जाणार आहे. 2030 पर्यंत 22 हजार लोकांच्या मेंदूमध्ये ही चीप बसवण्याचे उद्दिष्ट 'न्युरालिंक' कंपनीने ठेवले आहे. मेंदूत चीप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होईल. अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कण्याच्या दुखापती दूर करता येतील. शिवाय स्मृतिभ्रंश, नैराश्य, निद्रानाश या विकारांवरही मात करता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT