Latest

HSC Exam 2024 : आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या १२ वीच्या परीक्षांना बुधवार (दि. २१)पासून सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वीच 'सीबीएसई' बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झालेली असताना, आता राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांनाही सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता यावेळी शिक्षण मंडळाने महिनाभरापासूनच तयारी सुरू केली होती. विद्यार्थ्यांना दहा दिवसांपूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नाशिक विभागामध्ये चार जिल्हे येतात. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२४च्या लेखी परीक्षेला एक लाख ६८ हजार ६३६ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. एकूण २६८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आजपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. इंग्रजीच्या पेपरपासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.

पोलिस बंदोबस्त, भरारी पथके तैनात
१२वी च्या परीक्षा शांततेत आणि सुयोग्य पद्धतीने पार पडाव्या यासाठी पोलिसांचा बंदोबस्त २६८ परीक्षा केंद्रांवर असणार आहे. तसेच कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत.

परीक्षेसाठीची आकडेवारी
जिल्हा… विद्यार्थी संख्या… परीक्षा केंद्र
नाशिक… ७८,५२७… ११६
जळगाव… ४८,२७३… ७८
धुळे… २४,३०९… ४६
नंदुरबार… १७,५२७…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT