पुढारी ऑनलाईन
बॉलीवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादमुळे चर्चेत आहे. (Hrithik Girlfriends) जापनीज रेस्टॉरंटमधून दोघेही हातात हात घालून बाहेर पडतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान, सबा पूर्वीही हृतिकचे नाव अनेकींशी जोडले गेले आहे. त्यावर एक नजर… (Hrithik Girlfriends)
'काईटस्'या चित्रपटाच्या शूटिंगवेळी हृतिक आणि हॉलीवूड अभिनेत्री बार्बरा मोरी यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
रतीय-पोलिश वंशाची अभिनेत्री अँजेला क्रिलिंज्की हिच्यासोबत हृतिकचे नाव जोडले गेले होते. एका ट्विटमधून अँजेलाने दोघे रिलेशनमध्ये असल्याची हिंट दिली होती.
दरम्यान, 'काईटस्' आणि 'क्रिश -3'मध्ये हृतिक आणि कंगना एकत्र होते. तेव्हा दोघे रिलेशनमध्ये होते. कालांतराने कंगनाने एका मुलाखतीत हृतिकचा उल्लेख 'सिली एक्स' असा केला होता. कंगनाने हृतिकविरोधात सायबर स्टॉकिंगचीही तक्रार दाखल केली होती. तीन चित्रपटांत हृतिक आणि करिनाने काम केले. दोघेही रिलेशनमध्ये होते, असेही म्हणतात. करिनाने रिलेशनशिपच्या चर्चा अफवा असल्याचे म्हटले होते.
'बँग बँग'चित्रपटावेळी हृतिक आणि कॅट एकमेकांच्या खूप जवळ आल्याचे सांगितले जात होते. त्यातून हृतिक कंगनापासून दूर झाला होता. नंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्येही कॅटसोबत हृतिक होता. 'काबिल'चित्रपटानंतरपासून यामी आणि हृतिक डेट करत असल्याचे समोर आले होते. हृतिकमुळेच यामी पुलकित सम्राटपासून दूर झाल्याचे बोलले जात होते.
'मोहनजोदारो'चित्रपटानंतर हृतिक आणि पूजा यांचे नाव वारंवार जोडले गेले होते; पण पूजाने नेहमीच हृतिक मित्र आणि मेंटॉर असल्याचे म्हटले आहे.
सोनी लिव्ह या ओटीटीवर 4 फेब्रुवारी रोजी'रॉकेट बॉयज'नावाची वेबसीरिज रीलिज होत आहे. या सीरिजमध्ये सबाने वैज्ञानिक होमी जहाँगीर भाभा यांच्या प्रेमिकेची भूमिका साकारली आहे. तसेच हृतिक रोशनच्या 'विक्रमवेधा'मधील लूकलाही सोशल मीडियात म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. हा लूक हृतिकच्या चाहत्यांना 'वॉर'मधील लूकसारखाच वाटला. त्यामुळेच हृतिकला तसेच सबाला चर्चेत आणण्यासाठीच सबा आझादसोबत हा डिनर 'प्लॅन्ड' केला होता, असे समजते. पॅपराझी आल्यानंतरच हृतिक आणि सबा रेस्टॉरंटबाहेर पडले. दरवाजाबाहेर पडताच हृतिकने सबाचा हात हातात घेतला होता. सबाने 14 वर्षांपूर्वीच 'दिल कबड्डी'चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केले होते. नसिरूद्दीन शाहचा मुलगा इमादसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा होत्या.