Latest

Tandalache Ukadi Modak : तांदळाच्या पिठाचे मोदक तुटू नये यासाठी…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणरायाचे आगमन होत आहे. गणपतीच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक होय. आपण घरी गव्हाच्या पीठीचे आणि तांदळाच्या पीठाचे उकडीचे मोदक करतो. तांदळाच्या पीठाचे उकडीचे मोदक (Tandalache Ukadi Modak ) करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण, तांदळाच्या पीठामध्ये सारण भरताना मोदक तुटतात. तांदळाच्या पीठाचे उकडीचे मोदक तुटू नये म्हणून काय करावे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Tandalache Ukadi Modak )

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपे" servings="१५" prepration_time="२५" cooking_time="३०" calories="" image="" ingradient_name-0="तांदूळ पीठ" ingradient_name-1="मीठ" ingradient_name-2="गुळ किंवा साखर" ingradient_name-3="वेलदोडे पावडर" ingradient_name-4="पाणी" ingradient_name-5="तुप" ingradient_name-6="ओल्या खोबऱ्याचा किस" direction_name-0="सारण करण्यासाठी ओल्या नारळाचे खोबरे बारीक किसून घ्या" direction_name-1="गुळ किसून घ्या किंवा साखरही घालू शकता" direction_name-2="एक कढई घेऊन गॅसवर तापवत ठेवा, गॅस मंद आचेवर ठेवा" direction_name-3="कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घाला" direction_name-4="त्यात किसलेले खोबरे, गुळ घालून हलवत राहा" direction_name-5="मिश्रण कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्या" direction_name-6="वरून थोडी वेलदोडे पूड घाला" direction_name-7="जास्त वेळ सारण मिक्स करू नये, नाही तर ते घट्ट होईल" direction_name-8="सारण मऊ असतानाच गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यावे" direction_name-9="मोदकाचे तांदळाचे पीठ बनवण्यासाठी भांडे गॅसवर तापवून घ्या" direction_name-10="गॅस मंद आचेवर ठेवून त्यात एक कप पाणी घाला" direction_name-11="पाण्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप घाला" direction_name-12="या पाण्याला चांगली उकळ येऊन द्या, गॅस बंद करा" direction_name-13="आता तांदळाचे पीठ गरम पाण्यामध्ये थोडेथोडे घालत हलवून घ्या" direction_name-14="पीठ पटापट मिक्स करून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा" direction_name-15="आता पीठ आणि गरम पाणी एकजीव होईल, शिवाय तुपामुळे पीठ मऊ राहिल, कठीण होणार नाही" direction_name-16="हे मिश्रण किमान २० ते २५ मिनिटे ठेवून द्या" direction_name-17="पीठ जरा गरम गरम असतानाच मळून घ्या" direction_name-18="पीठ आणखी मऊ हवे असेल तर थोडे थोडे गरम पाणी घालून मळून घेऊ शकता" direction_name-19="पीठ चांगले मळून घ्या. यामुळे सारण भरताना मोदक तुटणार नाहीत" direction_name-20="आता मोदक करायला घ्या" direction_name-21="हवा तेवढा पीठाचा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्या" direction_name-22="त्यात सारण भरा, पाकळ्या गोळा करून हळूहळू दाबून मोदकाचा आकार द्या" direction_name-23="असे १०-१२ मोदक तयार करून घ्या" direction_name-24="आता अर्धे भांडे पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवा" direction_name-25="एका चाळणीला तेल किंवा तुपाचा हात लावून मोदक हळूवार ठेवून द्या" direction_name-26="झाकण ठेवून १५ ते १७ मिनिटे उकडा" direction_name-27="गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गरमागरम तांदळाच्या पीठाचे उकडी मोदक तयार आहेत" notes_name-0="" html="true"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT