Latest

Diwali Mugdal Ladu Recipe : बुंदी- बेसन- रव्याचे नाही तर मूग डाळीपासून बनवा लाडू

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दसऱ्याची लगबग संपली आणि नुकतेच सर्वाच्या आवडीचा सण म्हणजे, दिवाळीच्या धामधूमला सुरूवात झाली. यंदाच्या दिवाळी लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्व जण आनंदात साजरी करत आहेत. मग ते दिवाळीत कपड्याच्या खरेदीपासून ते खाण्याच्या पदार्थापर्यत. यासोबत खऱ्या अर्थाने दिवाळीत लाडू, चिवड, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, भाकरवडी अशा अनेक पदार्थाची मेजवाणीच असते. तर मग चला बनवूयात यातील एक पदार्थ म्हणजे, खमंग मूग डाळीचे लाडू. ( Diwali Mugdal Ladu Recipe )

मूग डाळ मानवाच्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मूग डाळ रक्तदाब नियंत्रणात ठेवते, कारण त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि भरपूर फायबर असते. फायबर भरपूर असल्याने ते बद्धकोष्ठता टाळते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते

[saswp_tiny_recipe recipe_by="अनुराधा कोरवी" course="गोड पदार्थ" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपे" servings="१०" prepration_time="१०" cooking_time="१०" calories="" image="" ingradient_name-0="एक कप मूग डाळ पीठ" ingradient_name-1="अर्धा कप तूप" ingradient_name-2="अर्धा कप पिठीसाखर" ingradient_name-3="अर्धा कप दूध" ingradient_name-4="एक चमचा वेलचीपूड" ingradient_name-5="बेदाणे, बदाम, पिस्ता यांचे काप" direction_name-0="मूगडाळ रवाळ पद्धतीची दळून आणा." direction_name-1="मध्यम गॅसवर पातेलं ठेवून त्यात थोडं तूप गरम करून मूळ डाळीचे पीठ भाजून घ्या." direction_name-2="पीठ भाजत असताना त्याचा रंग बदलला की, त्यावर थोडं दूध शिंपडून ढवळून घ्या." direction_name-3="यानंतर गॅस बंद करा आणि भाजलेलं पीठ खाली उरवून घ्या." direction_name-4="भाजलेल्या पीठ थोडंसं थंड झालं की, त्यात पिठीसाखर घाला." direction_name-5="त्यानंतर त्या पीठात वेलची पूड आणि कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता घाला. नंतर त्याचा लाडू बांधा." notes_name-0="या लाडूसाठी हिरवी आणि पिवळी मूगडाळ वापरू शकता. जर तुम्हाला हे लाडू पौष्टीक हवे असतील तर सालीसहीत डाळ वापरू शकता." html="true"]

SCROLL FOR NEXT