Latest

Diwali spicy Chirote Recipe : नेहमीपेक्षा हटके पद्धतीनं बनवा तिखट चिरोटे

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Diwali spicy Chirote Recipe :  दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली असून महिला वर्गाची नटण्या- मुरडण्यांसोबत फराळ बनवण्यासाठी लगबग सुरू झाली. नुकत्याच सर्वाचा आवडता सण म्हणजे, दिवाळी जवळ आलीय. दरम्यान घरात नवचैतन्य आणण्यासाठी आकर्षण दिव्याची आणि वेगवेगळ्या रांगोळीची आरास केली जाते. या काळात कुटूंबात चैतन्याच्या वातावरणासोबत पै-पाहूण्यांची रेलचेल पाहायला मिळते.

या काळात कपडे खरेदी करण्यापासून ते फराळावर ताव मारण्यास सर्व कुटूंबिय सज्ज असतात. चिवडा, करंजी, चकली, चिरोटे, मसाला वडी, बाकर वडी, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, शंकरपाळी हे पदार्थाची जणू मेजवाणीच असते. मात्र, खारीसारखे तोंडात पटकन विरघळणारे खास तिखट चिरोटे दिवाळीत बनवूयात. यासाठी जाणून घेवूयात रेसीपी… ( Diwali spicy Chirote Recipe )

[saswp_tiny_recipe recipe_by="अनुराधा कोरवी" course="तिखट" cusine="महाराष्ट्रीयन" difficulty="सोपं" servings="१५" prepration_time="२ ते २. ३०" cooking_time="१" calories="" image="" ingradient_name-0="तांदळाचे पीठ – १ वाटी" ingradient_name-1="गव्हाचे पीठ – ३ वाटी" ingradient_name-2="घरगुती तुप- अर्धा कप" ingradient_name-3="बटर किंवा डालडा- १०० ग्रॅम" ingradient_name-4="मेथी- २ चमचा" ingradient_name-5="चीली फ्लेक्स- २ चमचा" ingradient_name-6="कुटलेले जीरे- १ चमचा" ingradient_name-7="कुटलेली काळी मिरी- १ चमचा" ingradient_name-8="रवा- अर्धा कप" ingradient_name-9="ओवा- १ चमचा" ingradient_name-10="कॉर्न फ्लॉवर- २ चमचे" ingradient_name-11="चवीनुसार मीठ" ingradient_name-12="तळण्यासाठी तेल" direction_name-0="एका मोठ्या पसरट भांड्यात गव्हाचे पीठ, रवा आणि तूप एकत्रित करून चांगळे मळून घ्यावे." direction_name-1="चीली फ्लेक्स, काळी मिरी, मेथी, ओवा, कुटलेले जीरे, चवीनुसार मीठ घालावे." direction_name-2="सर्व मिश्रणात थोडे-थोडे पाणी घालून ते एकत्रित चांगले आणि घट्ट मळून गोळा तयार करावा." direction_name-3="यानंतर दोन तास हे मिश्रण भिजण्यासाठी झाकून ठेवावे." direction_name-4="दोन तासानंतर पुन्हा हे पीठ हलक्या हाताने मळून घेऊन त्याचे गोळे तयार करावा" direction_name-5="एका वाटीत बटर, कॉर्न फ्लॉवर आणि तांदळाचे पीठ एकत्रित करून घ्यावे." direction_name-6="तयार केलेल्या सर्व गोळ्याची पोळी, चपाती लाटून घ्यावी." direction_name-7="एक पोळी घेऊन त्यावर वाटीत तयार केलेले मिश्रण हाताने सर्व पोळीवर पसरवून घ्यावे." direction_name-8="अशाच प्रकारे एका पोळीवर दुसरी ठेवून यानंतर त्यावर तिसरी पोळी ठेवून सर्व पोळ्यांना ते मिश्रण लावून घ्यावे." direction_name-9="सर्व पोळ्यांचा एक मोठा लांब रोल बनवावा आणि रोलचे चाकूने छोटे-छोटे काप कापून घ्यावेत." direction_name-10="यानंतर हा रोल पुरीच्या आकारासारखा लाटून घ्यावा." direction_name-11="गॅसवरील कढाईत तेल गरम करून घ्यावे आणि त्यात तयार झालेले हे चिरोटे तळून घ्यावेत." direction_name-12="तयार झाले दिवाळीत खारीसारखे तोंडात पटकन विरघळणारे तिखट चिरोटे." notes_name-0="" html="true"]

SCROLL FOR NEXT