Latest

Navratri Special Upvasache Dhirde : नवरात्रीसाठी उपवासाचे धिरडे रेसिपी

स्वालिया न. शिकलगार

नवरात्रीच्या उपवासात फळांचे सेवन केले जाते. या काळात तुम्ही उपवासासाठी लागणारे टेस्टी धिरडे करू शकता. यावेळी बाहेरचे काही खाल्ले जात नाही. त्यामुळे उपवासासाठी विविध पदार्थ तयार केले जातात. (Navratri Special Upvasache Dhirde) खिचडी खाऊन कंटाळा असेल तर शाबूपासून विविध पदार्थ घरी बनवू शकता. गरमागरम खमंग उपवासाचे धिरड्याची रेसिपी आम्ही येथे देत आहोत.  (Navratri Special Upvasache Dhirde)

खमंग धिरडे बनवताना तेलाऐवजी तूपदेखील तुम्ही वापरला तर चालेल. हे धिरडे शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. हा पदार्थ तयार करायला फारसा वेळ लागत नाही. उपवास असणाऱ्यांसोबतच मुलेदेखील धिरडे आवडीने खातील. चपाती बनविण्याच्या तव्यावर धिरडे खूप कुरकुरीत तयार होतात.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="नाश्ता" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="७" prepration_time="१०" cooking_time="२०" calories="" image="618274" ingradient_name-0="साबुदाणा" ingradient_name-1="बटाटे" ingradient_name-2="भाजलेले शेंगदाणे" ingradient_name-3="हिरव्या मिरच्या" ingradient_name-4="कोथिंबीर" ingradient_name-5="मीठ" ingradient_name-6="जिरे" ingradient_name-7="साखर" ingradient_name-8="पाणी" ingradient_name-9="तेल" direction_name-0="वाटी साबुदाणा घेऊन स्वच्छ धुवावा. एका भांड्यात साबुदाणा चांगला भिजेल इतके पाणी घेऊन भिजत ठेवावे" direction_name-1="साबुदाण्याच्या मापानुसार बटाटे उकडून घेऊन सोलून ठेवा" direction_name-2="भाजलेल्या शेंगदाण्याचे मिक्सरमध्ये कुट करून घ्या" direction_name-3="आता हिरव्या मिरच्या (तिखटानुसार), कोथिंबीर एकत्र करून पेस्ट करून घ्यावे" direction_name-4="साबुदाणा भिजला असेल तर मिक्सरमध्ये पीठ करून घ्या" direction_name-5="एका मोठ्या भांड्यात साबुदाणा पीठ, शेंगदाणे कुट, कोथिंबीर-मिरची पेस्ट एकजीव करा" direction_name-6="वरून स्मॅश केलेले बटाटे टाका" direction_name-7="चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर टाकून मिश्रण पुन्हा एकत्र करा" direction_name-8="आता तवा किंवा पॅन गॅसवर तापवून घ्या" direction_name-9="मध्यम आचेवर गॅस ठेवून तव्यावर तेल टाकून डोसा करतो त्याप्रमाणे वाटीभर मिश्रण पसरवून घ्या" direction_name-10="कुरकुरीत धिरडे हवे असतील, पीठ पातळ पसरवून घ्यावे" direction_name-11="दोन्ही बाजूंनी पिवळसर रंग येऊपर्यंत धिरडे भाजून घ्या." direction_name-12="धिरडे तव्याला चिकटणार नाही, याची काळजी घ्या" notes_name-0="" html="true"]

SCROLL FOR NEXT