Latest

Gold Bonds : सुवर्ण रोख्यांत गुंतवणूक कशी कराल? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : साॅवरेन गोल्ड बाॅन्ड (SGB) स्किमची २०२१-२२ ची 'एक्स' सीरिज मंगळवारी (२८ फेब्रुवारी २०२२) सदस्यांसाठी उघडली आहे. ती ४ मार्च २०२२ मध्ये बंद होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने सोन्याचे दर ५१०९ प्रतिग्रॅम निर्धारित केलेली आहे. ऑनलाईन अर्ज केला तर ५० रुपयांची सूटदेखील देण्यात आली आहे. सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा भाग म्हणून सरकारने २०१५ साली 'गोल्ड बाॅन्ड'ची (Gold Bonds) स्किम सुरू केली. गोल्ड बाॅन्डचा रेट येत्या काळात आरबीआयकडून जाहीर करण्यात येईल.

आरबीआयच्या निर्देशानुसार गोल्ड बाॅन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अर्जदाराला पॅन क्रमांक देणं आवश्यक आहे. पॅन क्रमांक देणं ही पहिली अट आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय बॅंका सुवर्ण रोखे जारी करते. आरबीआयकडून आलेल्या परिपत्रकानुसार या सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अर्जदारांना ५१०९ दराने प्रतिग्रॅम सोने मिळणार आहेत. जर तुम्हाला सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर, अशा पद्धतीने करा.

SBI च्या गोल्ड बाॅन्डमध्ये कशी गुंतवणूक कराल?

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सुवर्ण रोख्यांमध्ये (Gold Bonds) गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाकडे नेटबॅंकिंगची आवश्यकता आहे. नसेल तर संबंधित शाखेतून नेटबॅंकिंगची सुविधा सक्रीय करून वैध लाॅग इन आयडी घ्यावी. त्यानंतर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करू शकाल.

SBI च्या गोल्ड बाॅन्डमध्ये रजिस्टर कसे कराल? 

– आपली ओळखपत्रं वापरून SBI चं नेट बॅंकिंग लाॅग इन करा.
– त्यानंतर e-Service या पर्यायावर क्लिक करून मेन मेन्यूमध्ये जा.
– तिथे Sovereign Gold Bond Scheme या पर्यायावर क्लिक करा.
– जर तुम्ही पहिल्यांदा गुंतवणूक करत असाल तर रजिस्टर करणं आवश्यक आहे. रजिस्टर पर्याय क्लिक करून अटी व शर्थी वाचून प्रोसीड करा.
– त्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स घालून पुढच्या पायरीवर जा.
– NSDL किंवा CDSL डिपाॅझरी निवडा, जिथे तुमचे डीमॅट अकांऊट असेल.
– त्यानंतर DP ID आणि Client ID घाला
– त्यानंतर सर्व डिटेल्स पुन्हा एकदा पाहून आणि खात्री करून सबमीट टॅबवर क्लिक करा.

SBI च्या गोल्ड बाॅन्डमध्ये सुवर्ण रोखे कसे खरेदी कराल? 

– आपली ओळखपत्रं वापरून SBI चं नेट बॅंकिंग लाॅग इन करा.
– त्यानंतर e-Service या पर्यायावर क्लिक करून मेन मेन्यूमध्ये जा.
– तिथे Sovereign Gold Bond Scheme या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर वरील बाजूस असणाऱ्या Purchase ही टॅब सिलेक्ट करा.
– अटी व शर्थी आणि 'Proceed' टॅब सिलेक्ट करा.
– 'Subscription quantity' यावर डिटेल्स भरा.
– त्यानंतर 'Submit' बटणा क्लिक करा.
– त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP घालून कन्फर्मवर क्लिक करा.
– त्यानंतर जे काही पेज तुमच्यासमोर उघडेल त्यावर सर्व डिटेल्स वाचला येतील. आणि तुम्ही सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकाल.

SCROLL FOR NEXT