Latest

रक्तवाढीसाठी ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा

दिनेश चोरगे

शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मग त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन अनेक औषधांची लिस्ट घेऊन ढीगभर औषधे किंवा इंजेक्शन घेऊन रक्तवाढीसाठी प्रयत्न करावे लागते. पण, काही घरगुती उपायांचा वापर केल्यास रक्तवृद्धी होऊ शकते.

  • रोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस घ्यावा. एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस घेताना त्यामध्ये थोडा बीटचा रस आणि मध टाकावे. यामध्ये लोहतत्त्व असते.
  • दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजत घाला. नंतर पाणी काढून टाकून याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये मध टाकून हे मिश्रण दिवसभरातून दोन वेळा घ्यावे. यामुळे रक्ताची कमतरता कमी होते.
  • शेंगदाणे हा घटक रक्तवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शेंगदाणे आणि गूळ चावून खाल्याने रक्तवाढ होते.
  • दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. आपल्या शरीराला सूर्यप्रकाश गरजेचा असतो.
  • चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा. अगदीच चहाची सवय असेल तर दिवसातून एकदाच गवती चहा, बडिशेप आणि दालचिनी समान मात्रेमध्ये घेऊन त्याचा चहा बनवून घ्या. हा चहा आरोग्यास आणि रक्तवृद्धीसाठी फायदेशीर आहे.
  • अंकुरित धान्य हेही रक्तवाढीसाठी उत्तम आहे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा अंकुरित धान्याचे सेवन करा.
  • मीठ आणि लसणाचे सेवन नियमित करा. यामुळे हिमोग्लोबीन वाढते.
  • सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिन युक्त असते.त्याचे सेवन केल्यास तो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळवून देण्यास मदत करतो.
  • नियमित बीटची कोशिंबीर, बीटचे सूप, बीटच्या स्लाईस आहारात घ्याव्यात.
  • आहारात टोमॅटोचा वापर जास्त प्रमाणात करावा. टोमॅटोत व्हिटॅमिन सीचे आणि लायकोपीनचे प्रमाण जास्त असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT