Latest

Good cholesterol : चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कसे वाढवावे?

Arun Patil

नवी दिल्ली : शरीरात चांगले आणि वाईट अशा दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल Good cholesterol असते. त्यापैकी वाईट कोलेस्टेरॉलने हृदयविकार, स्ट्रोकसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, चांगले कोलेस्टेरॉल शरीराला लाभदायक असते. जास्त घनता (हाय डेन्सिटी) असलेले लिपोप्रोटिन कोलेस्टेरॉल (एचडीएल) यालाच आपण सोप्या भाषेत 'चांगले कोलेस्टेरॉल' असे म्हणतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले जास्तीचे कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी 'एचडीएल' किंवा 'चांगले कोलेस्टेरॉल' मदत करते आणि हृदयाच्या आरोग्य जपण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. 'एचडीएल'ची उच्च पातळी असल्यास हृदयविकारांसंबधित धोका कमी होतो. 'चांगल्या कोलेस्टेरॉल'च्या पातळीमध्ये बदल करण्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये काही घटकांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स Good cholesterol आणि सॅच्युरेटेड फॅटस् असतात; जे 'एचडीएल'च्या पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला त्याची 'एचडीएल'ची पातळी वाढवायची असेल, तर आहारामध्ये बदल करावा लागेल. त्यासाठी सॅच्युरेडेट फॅटस् नसलेले पदार्थ, ओमेगा 3- फॅटी अ‍ॅसिड असलेले पदार्थ जसे की सुका मेवा, अ‍ॅव्होकॅडो, फॅटी फिश इ. आणि फायबरने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करावा लागेल.

आहारातील हा बदल परिणामकारक ठरू शकतो हे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. या संशोधनामध्ये सहा हजार लोक 12 वर्षांसाठी सहभागी झाले होते आणि जास्त प्रमाणात साखर असलेले पेय उदा. सोडा, फळांचा रस इ. यांचा 'एचडीएल' किंवा 'चांगल्या कोलेस्टेरॉल'च्या Good cholesterol पातळीवर कसा नकारात्मक परिणाम होतो हे दिसून आले. नियमित शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केल्यास 'एचडीएल'च्या पातळीमध्ये वाढ होते.

संशोधनातून असे समोर आले आहे की, 'जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही 10 किलो वजन कमी केले, तर तुमच्या 'एचडीएल'च्या पातळीत वाढ होऊ शकते. 'द अमेरिकन जर्नल ऑफ फिजिऑलॉजी'मध्ये म्हटले आहे की, आठवड्यातून तीन वेळा शारीरिक हालचाल किंवा व्यायाम प्रशिक्षण घेतल्यास सर्व प्रकारच्या शरीरयष्टीच्या व्यक्तींमधील चांगल्या कोलेस्टेरॉलच्या Good cholesterol पातळीत वाढ होऊ शकते.

SCROLL FOR NEXT