Latest

Gold : देशातील महिलांकडे इतके टन सोने आहे, तितके जगातील पहिल्‍या ५ बँकांकडेही नाही

backup backup

नवी दिल्ली ः सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आणि 'राजधातू' आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये सोने आढळते. या देशांच्या यादीत भारताचेही नाव आहे. चीनमध्ये सर्वाधिक सोने उत्खनन केले जाते. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागला. जगभरात सोन्याला खूप मागणी आहे. त्यामुळे सोने उत्खनन केले जात आहे. दरवर्षी जमिनीतून किती सोने बाहेर काढले जाते, ते जाणून घ्या.

सोने हे पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात जुन्या धातूंपैकी एक आहे, असे शास्त्रज्ञ आणि इतिहासकार सांगतात. जगभरात सोने हे केवळ धातू नसून ते आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे. आज आम्ही तुम्हाला भारतात कोणत्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत हे सांगत आहोत. अनेकांना माहीत आहे की, एक काळ असा होता जेव्हा भारताला 'गोल्डन बर्ड' म्हटले जायचे. इंग्रजांनीही भारतातून भरपूर सोने लुटले. यावरून आपल्या देशात भरपूर सोने असल्याचे स्पष्ट होते. आजही भारतात अनेक ठिकाणांहून सोने काढले जाते. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, जगात सोन्याची खाण सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढण्यात आले आहे. देशात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन कर्नाटकात होते.

येथील तुम्ही कोलार सोन्याच्या खाणीबद्दल ऐकले असेल. याशिवाय हुट्टी गोल्ड फिल्ड आणि उटी नावाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. याशिवाय आंध— प्रदेश आणि झारखंड राज्यातील हिराबुद्दिनी आणि केंद्रुकोचा खाणींमधूनही मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन केले जाते. या खाणींद्वारे, देशात वार्षिक 774 टन सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्खनन केले जाते जाते. तर जगभरात दरवर्षी 3 हजार टन सोने खाणीतून बाहेर काढले जाते. एका माहितीनुसार आपल्या देशातील महिलांकडे 21 हजार टन सोने आहे. जगातील पहिल्या 5 बँकांकडेही इतका सोन्याचा साठा नाही.

SCROLL FOR NEXT