Latest

एका दिवसात माणसाच्या डोक्यात किती येतात विचार?; त्‍याचा कशावर पडताे प्रभाव

Arun Patil

नवी दिल्लीः जगातील अतिशय वेगवान गोष्ट म्हटले की, प्रकाश असे उत्तर मिळते पण, त्यापेक्षाही वेगवान गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मन. माणसाच्या मनातील विचारांचा वेग कशाचाही पेक्षा जास्त आहे. माणूस विचारांचे किल्ले बांधून ते मोडूही शकतो. माणसाच्या डोक्यात दिवसभरात अनेक विचार येत असतात. त्यातील काही सकारात्मक असतात तर, काही नकारात्मक असतात. एका दिवसात माणसाच्या डोक्यात किती विचार येतात हे माहिती आहे का? कॅनडाच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्येही 'मेंदूतील विचार' या विषयावर संशोधन करण्यात आले. विद्यापीठाच्या संशोधनात असे आढळून आले की, मानवी मनात दररोज 6000 हून अधिक विचार येतात. यासोबतच त्याच्या मनात येणारे जवळपास 80 टक्के विचार हे नकारात्मक असल्याचेही समोर आले आहे.

मानवी मेंदू अतिशय रहस्यमय आहे. मेंदू आणि मेंदूचे कार्य याबाबत अजून खूप संशोधन होणे बाकी आहे. मानवी मेंदूबाबत जगभरातील विविध वैज्ञानिकांकडून विविध प्रकारचे संशोधन केले जात आहेत. काही संशोधनात समोर आले आहे की, मानव आपल्या मेंदूचा फक्त 10 टक्के वापर करतो. संशोधकांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, माणसाच्या मनात येणारे विचार त्याच्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या गोष्टींवर जास्त प्रभाव टाकतात, त्यामुळे मानव स्वतःच्या विचारांचा समतोल राखू शकत नाही, ते त्याच्यासोबत घडणार्‍या घडामोडींवर अवलंबून असते.

मानवी मनात येणारे विचार कसे समजून घ्यावेत यावर नुकतेच एक नवीन संशोधन झाले आहे. या नव्या पद्धतीमुळे माणसाच्या मनात किती विचार येतात हे कळू शकते. या तंत्राद्वारे मनात विचार आल्यावर प्रत्येक विचार वेगळा करता येतो. म्हणजेच एखाद्याच्या मनात 1 तासात 20 विचार येत असतील आणि 1 तासात 30 येत असतील किंवा 5 विचार 1 मिनिटात येत असतील, तर या तंत्रज्ञानाद्वारे ते सर्व विचार वेळेनुसार वेगळे करून संपूर्ण डेटा मिळवता येतो.

SCROLL FOR NEXT