Latest

मराठा आरक्षण कायदा लागू झाल्यानंतर राज्यात ‘खुल्या’ गटासाठी किती जागा राहिल्या? पाहा आकडेवारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्यात मराठा समाजासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी १० टक्के आरक्षणाचा कायदा २६ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाला आहे. यासाठी 'सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग' असा स्वतंत्र प्रवर्ग बनवण्यात आला आहे. राज्यात मराठा समाजासाठीचे आरक्षण लागू झाल्यानंतर राज्यात खुल्या वर्गासाठी (अराखीव) किती टक्के जागा राहिल्या आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली आकडेवारी पाहिली तर खुल्या वर्गासाठी आता २८ टक्के इतक्या जागा नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात उपलब्ध असणार आहेत.

राज्यात प्रवर्गनिहाय आरक्षणाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे

१. अनुसूचित – १३ टक्के
२. अनुसूचित – ७ टक्के
३. विमुक्त जाती (अ) – ३ टक्के
४. भटक्या जमाती (ब) – २.५ टक्के
५. भटक्या जमाती (क) – ३.५ टक्के
६. भटक्या जमाती (ड) – २ टक्के
७. विशेष मागास प्रवर्ग – २ टक्के
८. इतर मागास प्रवर्ग – १९ टक्के
९. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (मराठा) – १० टक्के
१०. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – १० टक्के
११. अराखीव (खुला) – २८ टक्के

SCROLL FOR NEXT