Latest

अजित पवारांसोबत किती आमदार? बावनकुळेंनी दिले उत्तर…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह गळाले लागले आहेत. राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा आज ( दि. २ ) शपथविधी होणार असून, अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत? या प्रश्नाचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी आज ( दि.२ )  माध्यमांशी बोलताना दिले.

बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४० आमदारसोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वेगाने प्रगती होत आहे. अजित पवार यांनी भाजप सरकार सोबत येण्याचा निर्णय घेवून त्याचे समर्थनच केले आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार ४० आमदारांना घेवून आमच्यासोबत येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT