Latest

पाऊस कसा मोजतात?

मोहन कारंडे

पावसाळ्यात पाऊस कसा मोजतात, त्याची एक विशिष्ट भाषा आहे. हवामान विभाग ही भाषा सतत वापरतो. मात्र, ती सामान्यांना समजत नाही. त्याचे अर्थ समजून घेतले, तर तो कसा मोजतात, हे आपल्यालादेखील सहज कळू शकते.

हवामान विभागाच्या तक्त्यावर डल्ब्यूएस, एफडब्ल्यूएस, एससीटी, आयएसओएल आणि ड्राय ही सांकेतिक भाषा वापरली जाते. देशातील कोणत्या राज्यात किती पाऊस झाला, होणार आहे, याचे संकेत दररोज याच सांकेतिक भाषेत दिले जातात. त्याचे रंगही ठरलेले असतात. रंगावरून हा कोणता अलर्ट आहे, हे कळते.

डब्ल्यू. एस. (अतिवृष्टी)

डब्ल्यू.एस. म्हणजे वाईड स्प्रेड या संकेताचा रंग गडद निळा आहे. त्या भागात अतिवृष्टी झाली किंवा होणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. या संकेतात ७६ ते १०० मिलिमीटर पावसाचा अंदाज धरला जातो.

एससीटी (कमी भागात)

याचा अर्थ स्कॅटर्ड असा असून, त्याला गडद हिरवा रंग दिला आहे. त्याचा अर्थ तुरळक भागात पाऊस पडेल, असा आहे. या संकेतात २६ ते ५० मि.मी. पावसाचा अंदाज दिला जातो.

एफ.डब्ल्यू.एस. (मुसळधार)

याचा अर्थ फेअरली वाईड स्प्रेड असा आहे. याचा रंग आकाशी दिला असून, मुसळधार पावसाचा अंदाज यातून दिला जातो. या संकेतानुसार ५१ ते ७५ मि. मी. पावसाचा अंदाज दिला जातो.

आयएसओएल (तुरळक ठिकाणी)

याचा अर्थ आयसोलेटेड अर्थात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा असून या संकेताचा रंग पोपटी दिला आहे. यात १ ते २५ मि. मी. पाऊस पडेल, असा अंदाज दिला जातो.

ड्राय (पाऊस नाही)

या संकेताला पांढरा रंग दिला असून, जेथे एकही थेंब पाऊस नाही. शून्य मिलिमीटर पाऊस म्हणजे कोरडा भाग, असा याचा अर्थ आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT