Latest

House of the Dragon Trailer : ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रिक्वेलचा ट्रेलर रीलिज

Arun Patil

पुढारी ऑनलाइन डेस्क : जगभरातून सर्वाधिक फॅन फॉलोईंग लाभलेली एक वेबसीरिज म्हणजे 'गेम ऑफ थ्रोन्स'. तर या सीरिजचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा प्रिक्वेल आता येत आहे. 'हाऊस ऑफ ड्रॅगन' (House of the Dragon Trailer) असे नाव असलेल्या या प्रिक्वेल सीरिजचा ट्रेलर गुरुवारी लाँच झाला. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या २०० वर्षे आधीचा कालखंड यात पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये किंग विसरीज याच्या सत्ताकाळातील हाऊस टारगेरियनचा इतिहास पाहायला मिळणार आहे. ही सीरिज जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या 'फायर अँड आईस' या कादंबरीवर आधारित आहे. २१ ऑगस्ट रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर या सीरिजचे पहिले १० एपिसोड रीलिज होणार आहेत.

कसा आहे ट्रेलर ? (House of the Dragon Trailer)

ट्रेलरची सुरुवात किंग व्हिसेरीस टारगारेनने त्याच्या पसंतीच्या वारसाला सिंहासनावर पाहण्याच्या त्याच्या स्वप्नाविषयी बोलताना केली. त्याची पहिली मुलगी रैनेरा ही पहिली स्पर्धक आहे, परंतु कोणतीही राणी कधीही सिंहासनावर बसलेली नाही. त्याच वेळी, असे काही लोक आहेत, ज्यांना व्हिसेरिसचा भाऊ डॅमन टारगारेनला त्याचा उत्तराधिकारी म्हणून पाहायचे आहे. या सगळ्यात राजाची नवीन पत्नी आई बनण्याची इच्छा व्यक्त करते. म्हणजेच सिंहासनाचा आणखी एक वारस जन्माला येणार आहे. त्याच वेळी, या सर्व त्रासांना सामोरे जाण्यासाठी, व्हिसेरिसने घोषणा केली की त्याने आपल्या नवीन वारसाचे नाव ठरवले आहे. वारसाचे नाव जाहीर होण्यापूर्वी डॅमन म्हणला, मीच आहे तुमचा वारस.

ही असेल कथा

गेम ऑफ थ्रोन्सच्या ३०० वर्षांपूर्वीची गोष्ट हाऊस ऑफ ड्रॅगन मध्ये असेल. गेम ऑफ थ्रोन्स सीरीज जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या पुस्तक ए सॉन्ग ऑफ आइस अँड फायरच्या कथेवर आधारित होता. तर हाऊस ऑफ ड्रॅगन त्यांच्या फायर अँड ब्लड या पुस्तकाच्या कथेवर आधारित आहे. संपूर्ण मालिका हाऊस टारगारेनच्या कथेबद्दल असेल, जो व्हॅलेरिया हा एकमेव भयानक शेवटापासून वाचलेला  आहे.

मालिका कधी रीलिज होणार? (House of the Dragon Trailer)

प्रीक्वलचा हा टीझर खूपच प्रेक्षणीय आहे. या टीझरमध्ये चाहत्यांना अनेक जुन्या स्टार्सची झलक पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर या प्रीक्वलचा हा टीझर रिलीज होताच चाहते मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ही कादंबरी 2018 साली लिहिली गेली आहे आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या सुरुवातीच्या २०० वर्षांपूर्वीची कथा दाखवते. तिची सुरुवात होते, जिथे राज्यातील गृहयुद्धासारख्या अनेक घडामोडी दाखवल्या जातील. यात गेम ऑफ थ्रोन्सच्या उर्वरित सीझनप्रमाणे १० भाग असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT