Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | साेमवार १८, २०२३

निलेश पोतदार


मेष :  श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. आत्मविश्वास अनुभवाल. नकारात्मक गोष्टी नातेसंबंध खराब करू शकतात. आळसामुळे काम टाळण्‍याकडे कल राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजन आणि खरेदीमध्ये वेळ घालवाल.

वृषभ : आज मनातील संभ्रम दूर होण्‍याची शक्‍यता. मुलांकडून सुवार्ता मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहिल, असे श्रीगणेश म्‍हणतात. धनप्राप्तीसाठी केलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळेल. तुमच्यातील नकारात्मक दोष दूर केल्‍यास सर्वोत्तम परिणाम प्राप्त करू शकता. मित्रांसोबत निष्‍कारण वेळ वाया घालवू नका. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्‍या.

मिथुन : आज तुमची सुप्‍त प्रतिभा समजून घ्या आणि त्यांना योग्य दिशेने वाटचाल सुरु करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. महत्त्वाच्या विषयावर भावांसोबत सकारात्मक चर्चा होईल. कार्यक्षेत्रात कामे शांततेने पूर्ण होतील. पती-पत्नीमधील सुसंवाद वाढेल. स्नायूंमध्ये दुखावण्‍याची शक्‍यता.

कर्क : आज तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. अचानक लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. दीर्घकालीन चिंता दूर होण्‍याची शक्‍यता. धार्मिक स्थळांना जाण्याचे नियोजन होईल. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपासून लांब रहा, अचानक घरी पाहुणे आल्‍याने काही महत्वाची कामे खोळंबतील. नातेवाईकांबद्दल सुवार्ता मिळाल्‍याने घरात उत्सवाचे वातावरण राहील.

सिंह : आजचा दिवस खूप लाभदायक आहे. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. धावपळ होईल; पण कामात मिळालेल्‍या यशामुळे तुमचा थकवा दूर होईल. जुने वाद पुन्‍हा होणार नाहीत याची काळजी घ्‍या. मुलांमध्ये आळस राहील. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. कोणत्याही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता.

कन्या : खोळबलेले सरकारी काम पूर्ण होण्‍याची शक्‍यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. घराची देखभाल आणि सजावटीवरही वेळ जाईल. व्‍यवसायात नवीन करार होतील. जास्त कामामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.

तूळ : तुमच्या मनात जी काही स्वप्ने किंवा कल्पना आहेत ते पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कामाच्या ठिकाणी कोणाशीही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. पती-पत्नीमध्ये काही काळापासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. आरोग्य उत्तम राहिल.

वृश्चिक : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक गुंतवणुकीत यश मिळेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कामात अधिक व्यस्त राहल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पोटदुखीचा त्रास जावण्‍याची शक्‍यता.

धनु : आज कोणत्याही महत्त्वाच्या कामात घरातील ज्येष्ठांना सहभागी करून घ्या, त्यांच्या योग्य सल्ल्याने यश मिळेल असे श्रीगणेश सांगतात. खूप राग आणि घाई तुमच्यासाठी गोष्टी खराब करू शकतात. तुमच्या उर्जेचा सकारात्मक वापर करा. आर्थिक बाबींवर जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक सुख-शांती कायम राहील. त्वचेची ॲलर्जीचा त्रास होवू शकतो.

मकर : आज विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात परिणामकारक ठरू शकतो. कल्पनांच्या दुनियेतून बाहेर पडण्याची गरज आहे. क्षेत्रातील धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घरातील वातावरण प्रसन्‍न राहील. अतिताण आणि नकारात्मक विचारांमुळे मनोबल कमी होऊ शकते.

कुंभ : कामाची आवड आणि उत्साह तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो, असे श्रीगणेश सांगतात. आज वाहने जपून वापरा. व्यवसायातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. पती-पत्नीमधील भावनिक बंध मजबूत राहतील. ताप आणि घशाचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता.

मीन : उत्पन्नाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रित कराल. घर सुधारण्याच्या बाबतीत नियमांचे पालन करणे तुमच्यासाठी उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून न राहता तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यामुळे तुमचे मनोबल मजबूत राहिल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT