Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार १९, २०२३

निलेश पोतदार


मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍हाला ग्रहांची साथ लाभेल. संततीच्‍या भविष्‍यासाठीचे नियोजन कराल. यामुळे संततीचा आत्‍मविश्‍वास वाढेल. सामाजिक कार्यात व्‍यस्‍त राहाल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन कामाचा शुभारंभ होईल. पती-पत्नीमध्ये चांगला संवाद साधता येईल. सावधगिरीने वाहन चालवा.

वृषभ : आज तुमच्‍या मनातील इच्छा पूर्ण होईल. नवीन काम सुरू सहकार्य लाभेल. आत्म-विश्लेषणाद्वारे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. विमा आणि कमिशन संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीमध्‍ये थोडा वाद होऊ शकतो. खोकला आणि तापाचा त्रास होऊ शकतो.

मिथुन : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव आज दूर होऊ शकतो, असे श्रीगणेश सांगतात. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. कुठेही पैसे गुंतवू नका. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांप्रती समर्पणाची भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. काही नकारात्मक विचार प्रबळ होऊ शकतात.

कर्क : आज उत्‍पन्‍नवाढीसाठी चांगला काळ आहे. तुम्ही तुमच्या विचार आणि बुद्धीने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल, असे श्रीगणेश म्‍हणतात. आज तुमच्या क्षेत्रात काम करण्याचा उत्साह असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.

सिंह : आज तुम्हाला मनःशांती मिळेल. नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंध सुधारतील, असे श्रीगणेश सांगतात. रागाला आवार घाला. उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये थोडा दोष असू शकतो. पती-पत्नीमध्ये मतभेद हेातील. सध्याच्या वातावरणामुळे सौम्य ताप असू शकतो.

कन्या: आज महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत असू शकते. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित व्हा. यावेळी चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. पती-पत्नींमधील संवाद वाढेल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

तूळ : आज थोडा वेळ आत्मचिंतन आणि एकांतात घालवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. दैनंदिन त्रासातून सुटका मिळू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात परिस्थिती सामान्य असेल. घरात आनंदी वातावरण राहिल. तब्‍येत सांभाळा.

वृश्चिक : तुमच्या आर्थिक योजनेशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. ते तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, असे श्रीगणेश सांगतात. घराच्या देखभालीच्या कामात योग्य वेळ घालवता येईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

धनु : आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. आपल्या बुद्धिमत्तेने समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. अतिरिक्‍त ताण टाळा.

मकर : श्रीगणेश सांगतात की, कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही नियोजित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याची हीच वेळ आहे. आर्थिक समस्‍या जाणवेल. एखाद्याशी संपर्क प्रस्थापित करताना काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले राहिल.

कुंभ : आर्थिकदृष्‍ट्या आजचा दिवस चांगला आहे, असे श्रीगणेश म्‍हणतात. कोणाशीही जास्त वादात पडू नका. हे तुमची बदनामी देखील करू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आपण ते हाताळण्यास सक्षम असाल. व्यवसायातील सर्व कामे नीटपणे पार पडतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल.

मीन : आज अडथळे असूनही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. सकारात्मक विचारांच्‍या लोकांसोबत वेळ घालवल्याने मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारामधील गैरसमज बाहेरच्या व्यक्तीमुळे होऊ शकतात. खोकला, ताप यासारख्या समस्या वाढू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT