चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आज तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्ही अनेक कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल; पण भावनेच्या आहारी जावून निर्णय घेवू नका. कोणताही निर्णय व्यावहारिकपणे घ्या, त्याचे चांगले परिणाम होतील, असा सल्ला श्रीगणेश देतात. जोखमीच्या कामात तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका. एखाद्याच्या गैरसमजामुळे तुमचा त्रास वाढेल. तसेच जवळच्या मित्रासोबतचे संबंध खराब होत आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक कार्यात केलेल्या नियोजनाचा लाभ मिळेल.
वृषभ : कौटुंबिक आणि आर्थिक संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. योजना सुरू केल्याने आनंद आणि मनःशांती मिळू शकते. तुमच्या आवडीसाठीही थोडा वेळ काढा. यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळू शकतो. निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका अन्यथा यश तुमच्या हातातून निसटून जाईल. बोलण्यावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात.
मिथुन : काही काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या तुम्ही अनेक मार्गांनी हाताळाल, असे श्रीगणेश सांगतात. आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल, त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये नवीन ऊर्जा जाणवेल. महत्त्वाच्या कागदपत्रे आणि वस्तू गहाळ होणार नाहीत याकडे लक्ष द्या. काही निर्णय घेण्यासाठी मुलांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे त्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. व्यावसायिक कामात गाफील राहू नका.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस तुमची स्वप्ने आणि आशा पूर्ण करण्याचा दिवस आहे. तुमची मनोकामना जाणून घ्या आणि आणि इतरांच्या सल्ल्याऐवजी कृती करा. खर्च जास्त असू शकतो. कुटुंबात आणि व्यवसायात बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. कर्मचाऱ्यांशी संबंध बिघडू नका. त्यांचा पाठिंबा तुमच्यासाठी आवश्यक आहे. व्यावसायिक ठिकाणी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याने मनात थोडी चिंता राहील.
सिंह : धार्मिक आणि अध्यात्मिक क्रियाकलापांमध्ये वाढणारी श्रद्धा आज तुम्हाला सकारात्मकता प्रदान करेल. आर्थिक बाबतीतही यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. यावेळी ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल असू शकते. फोन आणि मित्रांमध्ये व्यस्त राहून वेळ वाया घालवू नका. तुमचा अतिआत्मविश्वास त्रासदायक ठरु शकतो. सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा.
कन्या : आज विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत चांगले निकाल मिळतील. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे. आज कोणत्याही कारणाने काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे अनेक कामांना विलंब होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे कामात पूर्ण सहकार्य राहील, असे श्रीगणेश सांगतात.
तूळ : आज वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा राहील असे श्री गणेश सांगतात. त्यांचा आदर करा. मुलांकडून सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधून काढल्याने मन:शांतीही मिळू शकते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवर योग्य लक्ष केंद्रित करू शकाल राग आणि घाई तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्मचाऱ्यांचे कोणतेही टार्गेट पूर्ण झाल्याने बॉस आणि उच्च अधिकारी आनंदी होऊ शकतात.
वृश्चिक : आज मौजमजेकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. घरामध्ये नवीन सजावटीसाठी काही योजना होतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असेल. कोणतेही काम करताना निष्काळजी राहू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. कोणत्याही निष्कारण चर्चेत वेळ न घालवता तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रात जास्त काम होऊ शकते. पती-पत्नीने त्यांच्या नात्यात गैरसमज होऊ देऊ नये.
धनु : तुमची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्तेशी संबंधित कामांमध्येही किफायतशीर सौदे होऊ शकतात. मनाप्रमाणे कामे होतील. आळशीपणामुळे यश हातातून निसटू शकते. काही जुन्या नकारात्मक बोलण्यामुळे जवळचे नातेवाईकांशी दुरावा निर्माण होवू शकतो. व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये अनुभवी एखाद्याचा सल्ला घ्या. प्रेमप्रकरणात भावनिक अंतर वाढू शकते.
मकर : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही काही काळापासून जी कामे करण्याचा प्रयत्न करत आहात ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. बाहेरील स्त्रोताकडून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुमची कागदपत्रे पूर्ण ठेवा. मार्केटिंगशी संबंधित कामे आणि संपर्क मजबूत करण्यासाठी आज तुमचा वेळ लागेल.
कुंभ : आज विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करा. दुपारची स्थिती अधिक लाभदायक होत आहे. यावेळी केलेल्या मेहनतीचे नजीकच्या भविष्यात चांगले फळ मिळू शकते. जास्त चर्चा करण्यात वेळ घालवू नका. आपल्या योजना त्वरित सुरू करा. खर्च जास्त होईल. तसेच उत्पन्नाची स्थिती चांगली असल्यास कोणतीही अडचण येणार नाही. जनसंपर्क तुमच्यासाठी व्यवसायाचे नवीन स्रोत निर्माण करू शकतात, असे श्रीगणेश सांगतात.
मीन : दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या महत्त्वाच्या कामाची योजना करा. दुपारनंतर परिस्थिती अतिशय अनुकूल असल्याने तुमचे काम व्यवस्थित पार पडेल, असे श्रीगणेश सांगतात. भावनिकता आणि आळशीपणा तुमच्यात वाढू देऊ नका. यामुळे काही यश हातातून निसटू शकते. घरातील वडीलधाऱ्यांनाही तुमच्या देखरेखीची गरज आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्या. कार्यक्षेत्रातील सामानाशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे नुकसान होऊ शकते.