Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य; शनिवार ७ ऑक्‍टोबर २०२३, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

मोहन कारंडे

ज्यो. मंगेश महाडिक 

मेष : येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हासित राहा. धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर संध्याकाळी लाभ होऊ शकतो.

वृषभ : तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यागाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा.

मिथुन : स्थिती लवकरच सुधारेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला काहीच मान्य होणार नाही; परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका.

कर्क : कोणत्याही प्रकारे ताकद कमी पडते असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडत आहे. तुमच्या खर्‍या क्षमता काय आहेत ते ओळखा.

सिंह : पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल, तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. कुटुंबातील ताणतणावांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

कन्या : यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आर्थिक प्रश्नांमुळे विचार करण्याची ताकद नष्ट होईल.

तूळ : तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वत:साठी वेळ काढा.

वृश्चिक : तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल.

धनु :तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेमजीवनात तुम्हाला काहीतरी खास मिळणार आहे.

मकर : आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. मन प्रसन्न राहील.

कुंभ : आयुष्याबद्दल उदार द़ृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही.

मीन : प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल, तुम्हाला चांगले वाटेल आणि आत्मविश्वास बाळगू शकाल.

SCROLL FOR NEXT