Latest

आजच आपलं राशिभविष्य (दि. १५ एप्रिल २०२३)

दिनेश चोरगे

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : कामाच्या धबडग्यात मध्येमध्ये थोडा आराम करा. विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. मित्रमंडळींसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल. आर्थिकबाबतीत विचार करू नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कुटुंब, मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने मनाला उभारी मिळेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कुटुंबातील व्यक्तीसोबत वाद होण्याने वातावरण थोडे खराब होऊ शकते. परंतु, तुम्ही स्वतःला शांत ठेवा व धैर्याने काम करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, ही चांगली संधी ठरेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : संध्याकाळी कुणी बिनबुलाया मेहमानसोबत आज तुमचा दिवस व्यतीत होऊ शकतो. त्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. पैशाबाबत इतके गंभीर होऊ नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही, तर तुम्ही नाराज होऊ नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. खासगी नातेसंबंध संवेदनशील असतात. या राशीतील लोकांना हे समजण्याची आवश्यकता आहे.[/box]

SCROLL FOR NEXT