Latest

Michael Douglas : मायकल डग्लस यांना IFFI मध्ये सत्यजीत रे लाईफटाईम पुरस्कार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड अभिनेता आणि निर्माता मायकल डग्लस (Michael Douglas) यांना गोव्यात भारताकडून सन्मानित केलं जाईल. मायकल यांना ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवामध्ये 'सत्यजीत रे लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कारा'ने सन्मानित केले जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्विट करून घोषणा केली आहे. (Michael Douglas)

अनुराग ठाकुर यांनी पोस्ट शेअर करत दिली माहिती

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी X (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. अनुरागने या पोस्टमध्ये लिहिले की, 'मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, हॉलिवूडचा महान अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस यांना ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफटाईम पुरस्काराने सन्मानित केले जाईल.'

गोव्यात या दिवशी महोत्सव 

त्यांनी पुढे लिहिले, 'आपल्या देशावर (भारत) त्यांचे नितांत प्रेम सर्वश्रुत आहे. दक्षिण आशियातील सर्वात प्रमुख चित्रपट महोत्सवात त्यांची पत्नी कॅथरीन झेटा जोन्स आणि त्यांच्या मुलासह त्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.'

हा ५४ वा चित्रपट महोत्सव आहे. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT