Latest

Hitman Rohit Sharma : जेव्हा हिटमॅन रोहितनं मुंबई इंडियन्स विरोधात घेतली होती हॅटट्रिक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमध्ये सुरूवातीची वर्षे अॅडम गिलख्रिस्ट नेतृत्व करत असलेल्या डेक्कन चार्जर्स या संघाचा भाग होता. सध्या सलामीवीर म्हणून कारकिर्द गाजवत असलेल्या रोहितने करिअरची सुरूवात एक फिरकीपटू म्हणून केली होती. २००७ च्या वर्ल्डकपच्या भारताच्या विजयी संघातही रोहित शर्मा समावेश होता. (Hitman Rohit Sharma)

सध्या क्रिकेट विश्वात हिटमॅन म्हणून ओळख असलेल्या रोहितने २००९ साली आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेतली होती. मुंबई इंडियन्स वि. डेक्कन चार्जर्स हा सामना सेंच्यूरियन मध्ये खेळवला गेला होता. डेक्कन चार्जर्सने २० षटकांअखेर १४५ धावा केल्या होत्या. रोहितने यामध्ये ३८ धावांचे योगदान दिले होते. डेक्कन चार्जर्सने मुंबई इंडियन्ससमोर १४६ धावांचे आव्हान दिल्यानंतर मुंबईने चांगली सुरूवात केली होती. (Hitman Rohit Sharma)

मुंबईने १६ षटकांअखेर १०३ धावा केल्या होत्या. डेक्कन चार्जर्स खराब परिस्थितीत असतानाच रोहित शर्माने डाव पलटला होता. रोहितने १६ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर अभिषेक नायर आणि हरभजन सिंगला बाद केले. तर १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जे. पी. ड्यूमिनीला बाद करत रोहितने हॅटट्रिक घेतली होती. रोहितने हॅट्रिक करत डेक्कन चार्जर्सचा विजय निश्चित केला होता. (Hitman Sharma)

रोहितच्या हॅटट्रिकच्या जोरावर डेक्कन चार्जर्सने हा सामना १९ धावांनी जिंकला होता. २००९ साली डेक्कन चार्जर्स हा संघ चॅम्पियन बनला होता. रोहित हा आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सला रोहितने पाच वेळेस चॅम्पियन बनवले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पाच वेळेस चॅम्पियन बनला तर डेक्कन चार्जर्सचा संघ २००९ साली चॅम्पियन बनला होता. रोहित शर्मा ६ वेळेस चॅम्पियन टीमचा भाग राहिला आहे. (Hitman Rohit Sharma)

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.