Latest

हिंगोली : आडगावात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान

निलेश पोतदार

आडगाव (हिंगोली); रंजे प्रतिनिधी वसमत तालुक्यातील आडगाव येथे (रविवार) मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मध्यरात्री दोन वाजल्‍यापासून मेघगर्जनीसह पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे शेतातील पिकांना फटका बसणार आहे.

दरम्यान या पावसामुळे हरभरा पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाला मर लागण्याची शक्यता आहे. तसेच वेचणीस आलेल्या कापसालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कापसाची झाडे पूर्णतः झोपली आहेत. याचबरोबर फुलांच्या अवस्थेत असलेल्या तुरीचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन सुद्धा झाले नाहीत. पिक विमा आणि सरकारचे अनुदानही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. कर्ज काढून कशीबशी शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली होती.त्यातच ह्या अवकाळी पावसामुळे त्याचेही नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. ताबडतोब झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT