Latest

Hinduja Group : 108 वर्षांचा इतिहास असणारा हिंदुजा ग्रुप विभागणार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Hinduja Group : ऑटोमोबाईल, बँकिंग, केमिकल्स, मीडिया , स्वास्थ्य, पॉवर आदी क्षेत्रात डील करणा-या 108 वर्षे जुन्या हिंदुजा ग्रुपमध्ये व्यावसायिक वाटणी होणार आहे. तब्बल 1.5 लाख कर्मचारी असलेल्या हिंदुजा ग्रुपमध्ये वाटणी होणे ही व्यवसाय क्षेत्रातील एक मोठी घटना असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाटणी याच महिन्यात नोव्हेंबरमध्ये होणार आहे. जर नोव्हेंबरमध्ये ही वाटणी पूर्ण न झाल्यास पुन्हा न्यायालयात प्रकरण पोहोचू शकते.

Hinduja Group : हिंदुजा कुटुंब हे ब्रिटन स्थित सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहे. हिंदुजा ग्रुप हे तब्बल 108 वर्ष जुने आहे. हिंदुजा ग्रुपचे एकूण नेटवर्थ 14 अब्ज डॉलर इतके आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात डील करून मोठे नाव निर्माण केलेल्या हिंदुजा परिवारात गेल्या अनेक दिवसांपासून विवाद सुरु होते. काही दिवसांपूर्वी हे विवाद निवळले असून पुन्हा सर्व सुरळीत होणार, अशा बातम्या होत्या. मात्र, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुजा ग्रुपमध्ये नोव्हेंबर महिन्यातच वाटणी पूर्ण होणार आहे.

हिंदुजा बंधुंमध्ये वयाने सर्वात मोठ्या असलेल्या 86 वर्षीय श्रीचंद हिंदुजा यांच्या वकिलाने लंडनच्या न्यायालयात सांगितले आहे की, त्यांचा परिवार 2014 च्या एका आपसी कराराला समाप्त करण्यासाठी सहमत झाला आहे. याबाबत कुटुंबात 30 जून 2022 ला सहमती बनली होती.

Hinduja Group : हिंदुजा ग्रुपची स्थापना आणि कुटुंब

हिंदुजा ग्रुपची स्थापना वर्ष 1914 मध्ये परमानंद यांनी फाळणीपूर्व ब्रिटिश भारतातील सिंध प्रांतातून केली होती. सुरुवातीला ते फक्त कमोडिटी ट्रेडिंग फर्मच्या स्वरुपात कारोबार करत असत. सुरुवातीला सिंधमधील शिकापूर, मुंबई नंतर त्यांनी इराणमध्ये आपला व्यवसाय वाढवला. 1919 पासून त्यांनी आपला आंतरराष्ट्रीय कारोबार सुरु केला. मात्र 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक रिव्हॉल्यूशन नंतर ते आपल्या कुटंबासह युरोपमध्ये स्थलांतरित झाले.

Hinduja Group : परमचंद हिंदुजा यांना एकूण चार मुले आहेत. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी ऑटोमोबाईल, केमिकल अशा विविध क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला. 1979 मध्ये हिंदुजा ग्रुपचे चेअरमन श्रीचंद आहुजा आणि त्यांचे बंधु गोपीचंद हिंदुजा जे तेव्हा को-चेअरमन होते ते दोघेही लंडन येथे एक्सोपर्ट व्यवसाय वाढविण्यासाठी ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून हिंदुजा कुटुंब ब्रिटनमध्ये स्थित आहे. तर त्यांचे तिसरे भाऊ प्रकाश हिंदुजा हे नंतर ग्रुप ऑपरेशनसाठी जिनिव्हा येथे स्थलांतरित झाले. तर सर्वात लहान भाऊ अशोक यांनी भारतात व्यवसाय वाढविण्यासाठी भारतात आले.

भारतात त्यांनी अशोक लेलँड हा ट्रक बनवण्याच्या उद्योगातून सुरुवात केली. भारतात ट्रक बनवणा-या वाहन उद्योगात अशोक लेलँड ही कंपनी प्रमुख आहे. याशिवाय भारतात हिंदुजा ग्रुपचे बैंकिग, केमिकल्स, मीडिया आणि स्वास्थ क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या लिस्टेड आहे. बँकिंग क्षेत्रात इंडसइंड बँक सारखा मोठा ब्रँडचा देखिल समावेश आहे.

Hinduja Group : 108 वर्षे जुन्या हिंदुजा परिवारात वाटणी होण्याचे कारण
हिंदुजा कुटुंबात सुरू असलेल्या वादाचे कारण म्हणजे 2014 मध्ये झालेला कौटुंबिक समझोता. करारात असे म्हटले होते की कुटुंबातील सर्व काही प्रत्येक व्यक्तीचे आहे आणि काहीही कोणाचे नाही. या करारावर कुटुंबातील चार भावांनी सह्या केल्या होत्या. तथापि, सेटलमेंटनंतर काही वर्षांनी, मोठा भाऊ श्रीचंद हिंदुजा यांच्या मुली शानू आणि वीणू यांनी आव्हान दिले. त्यानंतर श्रीचंद हिंदुजा आपले भाऊ जीपी हिंदुजा, पीपी हिंदुजा आणि एपी हिंदुजा यांच्या विरोधात न्यायालयात पोहोचले. प्रकरण कराराच्या वैधतेशी संबंधित होते. दुसरीकडे, तीन लहान भावांनी असा युक्तिवाद केला की हे पत्र 100 वर्षांहून अधिक जुन्या हिंदुजा समूहाची उत्तराधिकार योजना आहे. नोव्हेंबर 2019 पासून यावर कायदेशीर वाद सुरू आहे. ब्रिटनशिवाय युरोपातील अनेक देशांमध्ये हिंदुजा ब्रदर्समध्ये हा कायदेशीर संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेलाही मोठा तडा गेला आहे.

Hinduja Group : नोव्हेंबरमध्येच होणार वाटणी

सूत्रांच्या माहितीनुसार हिंदुजा कुटुंबात वाटणीला अंतिम रुप याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्येच दिले जाणार आहे. जर नोव्हेंबरमध्ये यावर अंतिम निर्णय झाला नाही तर प्रकरण पुन्हा लंडनच्या न्यायालयात जाईल. हिंदुजा ग्रुपकडे डझनावर कंपन्यांचे स्वामित्व मालकी हक्क आहे. ज्यामध्ये सहा कंपन्या लिस्टेड आहे.

Hinduja Group : जवळपास 14 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या हिंदुजा ग्रुपच्या या कंपन्या…

हिंदुजा हाउसिंग फायनान्स लि.
अशोक लेलँड
ऑप्टारे
अशोक लेलँड फाउंड्रीज – अशोक लेलँडचा एक विभाग, ज्याला हिंदुजा फाउंड्री असेही म्हणतात
पी.डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर
पी.डी. हिंदुजा सिंधी हॉस्पिटल बंगलोर
हिंदुजा हेल्थकेअर लिमिटेड
हिंदुजा बँक (स्वित्झर्लंड) लिमिटेड (पूर्वीची अमास बँक)
इंडसइंड बँक
हिंदुजा लेलँड फायनान्स लि.
हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लि.
GOCL कॉर्पोरेशन लि.
गल्फ ऑइल इंटरनॅशनल लि.
गल्फ ऑइल लुब्रिकंट्स इंडिया लिमिटेड
क्वेकर-हॉटन इंटरनॅशनल लि
गल्फ ऑइल मिडल ईस्ट लि
हिंदुजा नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन लि.
हिंदुजा रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड
हिंदुजा रियल्टी व्हेंचर्स लि.
हिंदुजा ग्रुप इंडिया लिमिटेड
केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स
NXTDIGITAL Ltd (पूर्वीचे हिंदुजा व्हेंचर्स लिमिटेड) – Nxtdigital Hits, OneOTT iNtertainment Ltd, INE, आणि INDigital यांचा समावेश आहे
सायकरेक्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड
ब्रिटिश मेटल कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
हिंदुजा इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोजेक्ट सर्व्हिसेस लि.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT