Latest

Hindenburg Report | अदानीनंतर हिंडेनबर्गचा ‘या’ ३५ वर्षाच्या रशियन अब्जाधिशावर केला गंभीर आरोप, जाणून घ्या प्रकरण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंडेनबर्गने भारतातील उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले. यानंतर हिंडेनबर्गच्या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात एका रशियन अब्जाधिशाच्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. हिंडेनबर्गने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात रशियन अब्जाधीश तैमूर तुर्लोव्ह यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप (Hindenburg Report)  केला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च ही एक अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था आहे. या संस्थेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात कझाकस्तानस्थित रिटेल ब्रोकरेज फर्म, 'फ्रीडम होल्डिंग कॉर्पोरेशन'वर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील अहवाल (Hindenburg Report) हिंडेनबर्गने मंगळवारी (दि.२९) उघड केला आहे.

यूएस आधारित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने 'फ्रीडम होल्डिंग कॉर्पोरेशनवर 'स्वत: च्या स्टॉक किंमतीत फेरफार केल्याचा आणि ग्राहक निधी एकत्र करत महसूल गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ इगोर सेचिन यांनी रशियन कुलीन यांच्याकडून बँक विकत घेतल्यानंतर 'फ्रीडम होल्डिंग' चा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे देखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सेचिन यांचे वर्णन पुतीन नंतर रशियामधील दुसरे सर्वात महत्वाचे व्यक्ती म्हणून केले गेले (Hindenburg Report) आहे.

हिंडेनबर्ग अहवालात फसवणुकीचा आरोप केलेल्या 'फ्रीडम होल्डिंग'विषयी

अब्जाधीश तैमूर तुर्लोव्ह, एक रशियन वंशाचे कझाक उद्योजक असून, ते 'फ्रीडम होल्डिंग कॉर्पोरेशन' चे सीईओ आहेत. ही कझाकस्तान आधारित रिटेल ब्रोकरेज कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २००८ मध्ये मॉस्कोमध्ये झाली आणि नंतर कझाकस्तानमध्ये ही कंपनी स्थिरावली. कंपनी सध्या मध्य आशिया, युरोप आणि यूएस मध्ये कार्यरत आहे. 'फ्रीडम होल्डिंग कॉर्पोरेशन' चे सीईओ 'तैमूर तुर्लोव्ह' हे २०२१ पासून फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत (Hindenburg Report) आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT