Latest

हिमालयातील हिमनद्यांचा स्वत:च्या बचावासाठी संघर्ष

दिनेश चोरगे

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनदी सध्या स्वत:च्या बचावासाठी बराच संघर्ष करत आहेत. जगभरातील वाढत्या तापमानामुळे हिमनद्यांना बर्फाच्या पटलाशी संपर्कात येणार्‍या हवेला वेगाने थंड होण्यासाठी भाग पाडत आहे. येणारी थंड हवा हिमनद्यांना आणखी थंड करण्यात आणि आसपासच्या परिस्थितीय तंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करत असते. मात्र, आता वाढत्या तापमानामुळे याचा र्‍हास होत आहे.

हिमालय जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, भुतान, नेपाळ इथवर विस्तारलेले हे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थान आहे. जगातील बहुतेक उंच पर्वत शिखरे हिमालयात आहेत. हिमालयात सर्वात जास्त 100 शिखरे आहेत. जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट हिमालयातील एक शिखर आहे. जगातील सर्वच 8,000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची 8,850 मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के 2 व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी 2,400 कि.मी.पेक्षाही जास्त आहे. ती भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान या देशांमधून जाते. हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण राहण्यास मदत होते.

हिमालयात दहा हजारांहून अधिक पर्वत शिखरे आहेत. मात्र, जलवायू परिवर्तनाचा या क्षेत्राला धोका आहे आणि हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे धोकादायक ठरू शकतात, अशी भीती आता निर्माण झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑस्ट्रिया आयएसटीएचे प्राध्यापक फ्रान्सेस्का पेलिसियोटीच्या नेतृत्वाखाली एका संशोधन पथकाने यावर अभ्यास केला. हा शोधनिबंध नेचर जियो सायन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्यांवरील गरम वातावरणीय हवा आणि हिमनद्यांच्या पटलाशी थेट संपर्कात येणारी हवा याच्या तापमानातील अंतर वाढत जाते. संशोधकांनुसार, यामुळे हिमनद्यांवरील तापमानात वृद्धी होते आणि पटलावर त्याचे परिणाम दिसून येऊ लागतात. अर्थात अजूनही वेळ निघून गेलेली नाही आणि यावर काय करता येईल, यावर सध्या लक्ष केंद्रित केले गेले आहे.

SCROLL FOR NEXT