Latest

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमधील हिमवृष्टीमूळे १२१ रस्ते बंद

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेश प्रदेशमधील लाहुल-स्पीती, कुल्लू, शिमला, किन्नौर आणि चंबा जिल्ह्यांतील उंच टेकड्यांवर  झालेल्या हिमवृष्टीनंतर, या जिल्ह्यांतील  १२१ रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण माहितीनूसार, या भागातील पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी. (Himachal Pradesh)

शिमला हवामान विभागाचे संचालक सुरेंदर पॉल यांनी काल (दि.२१) सांगितले होते की, लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील कोकसरमध्ये १७ सेमी बर्फवृष्टी झाली आहे; शिमल्यात १९ मिमी, मनालीमध्ये १३ मिमी, तर भरमौर आणि कोठीमध्ये प्रत्येकी ५ मिमी पाऊस पडला आहे. तर लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील कोकसरमध्ये १७ सेमी बर्फवृष्टी झाली आहे. "गोंडला येथे १२ सेमी, कुकुमसेरी ९ सेमी आणि आदिवासी जिल्ह्याच्या प्रशासकीय मुख्यालयात ६ सेमी बर्फाची नोंद झाली आहे. शिमलाच्या बाहेरील प्रसिद्ध हिल स्टेशन कुफरी येथे १.५ सेमी बर्फवृष्टी झाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT