पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेसने हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सिंह सुक्खू यांचे नाव घोषित केले आहे. आज (दि. ११) दुपारी दीड वाजता शिमला येथील रिज मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. शिमला येथे शनिवारी संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत सुक्खू यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडल्या आहेत.
चार वेळा आमदार आणि माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू यांना हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री तर सध्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर, लवकरच नवीन मंत्रिमंडळासाठी मंत्र्यांची नावे घोषित केली जाणार आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर होताच सुक्खू भावूक झाले. त्यांनी यावेळी गांधी परिवाराचे आभार मानले. तसेच हिमाचलच्या नागरिकांचे आणि हिमाचल कॉंग्रेसकमिटीचेही आभार मानले.
हे वाचलंत का?