Latest

Union Budget 2022 : २५ हजार किलोमीटर महामार्गाचा होणार विस्‍तार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
केंद्र सरकार देशातील पायाभूत सुविधा क्षेत्राच्‍या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान गती शक्‍ती योजनेतून देशातील २५ हजार किलोमीटर महामार्गाचा विस्‍तार केला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

पायाभूत सुविधाच्‍या विकासामुळे खासगी गुंतवणुकीला चालना मिळते. पायाभूत सुविधेच्‍या माध्‍यमातून देशाच्‍याअर्थव्‍यवस्‍थेचे पुनरुज्‍जीवन आणि रोजगार निर्मितीलाही चालना मिळते. यामुळेच केंद्र सरकारचे २५ हजार किलोमीटर महामार्ग विस्‍ताराचे उद्‍दिष्‍ट्य आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्‍पष्‍ट केले.

पुढील तीन वर्षांमध्‍ये ४०० नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करणार

पुढील तीन वर्षांमध्‍ये ४०० नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्‍यात येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. देशभरात १०० पीएम गती शक्‍ती कार्गो टर्निमलही विकसित करण्‍यात येतील, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
या वेळी अर्थमंत्री म्‍हणाल्‍या, पुढी तीन वर्षांमध्‍ये देशात नवीन ४०० वंदे भारत एक्‍सप्रेस सुरु करण्‍याचे सरकारचे उद्‍दीष्‍ट्य आहे. वंदे भारत एक्‍सप्रेसच्‍या या नवीन मॉडेलमुळे रेल्‍वे प्रवास हा आधुनिक आणि अधिक सुविधाजन्‍य होण्‍यास मदत होईल. पुढील तीन वर्षात देशभरात १०० पीएम गती शक्‍ती कार्गो टर्निमलही विकसित करण्‍यात येतील, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT