Latest

असा शेवयाचा चटपटीत उपमा बनवाल तर सगळे आवडीने खातील

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पोहे, शिरा, उपमा हे नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आम्ही तुम्हाला झटपट शेवयांचा उपमा बनवण्याची कृती सांगणार आहोत. ही रेसिपी मोठ्यांसह लहान मुलांनाही खूप आवडेल, यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा.

सर्विंग्स- 2
कॅलरीज- 110
खाद्यसंस्कृती- भारतीय

साहित्य

शेवया- 1 कप, गरम पाणी- 2 कप, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो- 1, मटार दाणे- 1/2 कप, हिरव्या मिरच्या- 2-3, लिंबाचा रस- 1 टेबलस्पून, तेल- 1 टेबलस्पून, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग- 1 टीस्पून, उडीद डाळ- 1/2 टीस्पून, चवीप्रमाणे मीठ

कृती

• कढईत तेल न घालता शेवया थोड्या लालसर रंगावर भाजुन घ्या. मग ते बाजुला काढुन ठेवून त्याच कढईत तेल तापायला ठेवा.
• जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी तयार करा. मोहरी तडतडली की त्यात उडीद डाळ घालुन तांबूस रंगावर परता. मग त्यातच कांदा, टोमॅटो आणि मिरची घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात मटारचे दाणे घालुन बारीक गॅसवर 2-3 मिनीटे परतून घ्या.

• आता यात भाजलेल्या शेवया घाला व 2-3 मिनिटे परतून घ्या. आता दीड कप गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण नीट एकजीव करून कढईवर झाकण ठेवा. शेवया पूर्ण शिजल्या नसतील तर अजून थोडे पाणी घालुन पुन्हा झाकुन ठेवा. शेवया फुलल्या सारख्या वाटल्या आणि पूर्ण पाणी आटले की झाकण काढा. आता यावर लिंबाचा रस घालून मिक्स करा.

• एकसाथ जास्त पाणी घालू नका, अन्यथा शेवयांचा लगदा होतो. 10-15 मिनिटात हा पौष्टीक आणि अतिशय चविष्ट नाश्ता तयार होतो. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

SCROLL FOR NEXT