Latest

कुणाच्या गाडीला अपघात तर कुणाचं विमान कोसळलं, अपघातात ‘या’ नेत्यांचा गेला जीव

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. एएनआयच्या वृत्तानुसार या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत देखील उपस्थित होते. याशिवाय त्यांची पत्नीदेखील त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये होत्या. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये १४ जण प्रवास करतो होते, त्यापैकी ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. माहितीनुसार बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते. या पूर्वीही काही महत्वाच्या व्यक्तींचा हेलिकॉप्टर किंवा कार अपघातात मृत्यू झाला आहे.

संजय गांधी हे इंदिरा गांधींचे धाकटे पुत्र होते. आईप्रमाणेच ते राजकारणातही सक्रिय होते. खऱ्या अर्थाने ते इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी मानले जात होते. पण जून 1980 मध्ये संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला.

सप्टेंबर 2001 मध्ये मैनपुरी जिल्ह्यात एक खाजगी विमान कोसळले. या अपघातात ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. ज्योतिरादित्य यांनी वडिलांच्या निधनानंतरच राजकारणात प्रवेश केला.

सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट हे काँग्रेसचे मोठे नेते होते. ते राजस्थानमधील दौसा येथून खासदार होते. जून 2000 मध्ये मतदारसंघ परिसरात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.

2014 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचेदेखील कार अपघातात निधन झाले. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि ते राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मृत्यूसमयी ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

वायएस राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २००९ मध्ये त्यांचे हेलिकॉप्टर राज्यातील रुद्रकोंडा भागात कोसळले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे हेलिकॉप्टर २४ तास बेपत्ता होते.

SCROLL FOR NEXT