Latest

गगनबावडासह तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुुक्रवारी मध्यरात्रीच मान्सून दाखल झाला. जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला. गगनबावडा परिसरात आणि तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 5.4 मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात या काळात तब्बल 90 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सरासरी 58 मि.मी. पाऊस बरसला. चंदगड तालुक्यातही 19 मि.मी., भुदरगडमध्ये 6.9 मि.मी., तर शाहूवाडी, राधानगरी, आजरा तालुक्यांतही सरासरी 4 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला.

धरण क्षेत्रांत दमदार पाऊस

जिल्ह्यात धरण क्षेत्रांत गेल्या 24 तासांत दमदार पाऊस झाला. कुंभी, घटप्रभा आणि जांबरे प्रकल्पांत अतिवृष्टी झाली. कुंभी परिसरात 70 मि.मी., तर घटप्रभा आणि जांबरे परिसरात प्रत्येकी 65 मि.मी. पाऊस झाला. कासारी परिसरात 51 मि.मी., कोदे परिसरात 36 मि.मी., पाटगाव परिसरात 28 मि.मी., दूधगंगेत 25 मि.मी., तर राधानगरीत 18 मि.मी. पाऊस झाला. तुळशीत 16, वारणेत 11, तर चित्रीत 10 मि.मी. पावसाची नोंद झाली.

SCROLL FOR NEXT