Latest

Maharashtra Rain Alert | राज्यातील ‘या’ भागांत अतिवृष्टीचा इशारा

Arun Patil

पुणे, पुढारी वृत्तसेवा : देशातील बहुतांश राज्यांत अतिवृष्टी सुरू असून, गुरुवारी (दि. 6) कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. कोकण व मध्य महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत पाऊस वाढणार असून, मराठवाडा, विदर्भात मात्र 8 जुलैनंतर तो ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Rain Alert)

देशातील सर्वच राज्यांना 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, यात अंदमानसह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

असे आहेत अलर्ट

– कोकण : 7 ते 10 जुलै : अतिवृष्टी.
– मध्य महाराष्ट्र : 7 व 8 जुलै : अतिवृष्टी, 9 व 10 जुलै : मुसळधार.
– मराठवाडा : 7 व 8 जुलै : अतिवृष्टी, 9 व 10 जुलै : मध्यम पाऊस.
संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना पुणे शहरासह जिल्ह्यात पाऊस कमी आहे. घाटमाथ्यावरचा पाऊस अचानक कमी झाला असून, तेथे गुरुवारी धारावी भागात 96 मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, इतर भागांत केवळ 10 ते 20 मि.मी. पावसाची नोंद झाली.

24 तासांत राज्यात पडलेला पाऊस (मि.मी.)

कोकण विभाग : वैभववाडी 180, पालघर 146, मडगाव 140, पेडणे 131, कुडाळ 130, फोंडा 126, कणकवली 126, म्हापसा 125, देवगड 120, सावंतवाडी 110, मालवण 94, दोडामार्ग 78, साांताक्रुझ 69, वसई 66, श्रीवर्धन 61, लांजा 50.
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 116, साक्री 62, राहुरी 61, श्रीगोंदा 54. (Maharashtra Rain Alert)

SCROLL FOR NEXT